फुले रुग्णालयातील बाल विभाग पुन्हा सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलचा बाल विभाग बंद केल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच वंदे मातरम यूथ ऑर्गनायझेशन या संघटनेने महापालिकेच्या आरोग्याधिकारी डॉ. वाडेकर यांना धारेवर धरत हा विभाग सुरू करण्याची मागणी केली. ‘सकाळ’च्या बातमीचा परिणाम आणि संघटनेने दिलेला आंदोलनाचा इशारा यामुळे या रुग्णालयातील बाल विभाग पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमधील बाल विभाग बंद पडल्याची बातमी ‘सकाळ’ने मंगळवारी (ता. २६) प्रसिद्ध केली. त्यानंतर रुग्णालयातील प्रश्‍नांबाबत पाठपुरावा करणाऱ्या ‘वंदे मातरम’ संघटनेने आरोग्याधिकारी डॉ. वाडेकर यांची भेट घेतली. विभाग बंद पडला तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला. 

संघटनेचे अवधूत भाट्ये यांनी अधिकाऱ्यांची भेट घेतली. सावित्रीबाई फुले हॉस्पिटलच्या आंदोलनात अवधूत भाट्ये, बंडा साळुंखे, महेश उरसाल, विजय करजगार, सुनील पाटील, शरद माळी, गणेश संकपाळ, धनंजय पाटील, प्रवीण सुर्वे, पंकज कुरणे, अभय थोरात, रोहित अतिग्रे, महेश साळोखे, अजिंक्‍य पाटील आदींनी भाग घेतला.