जैन समाजाच्या दोन गटांत हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

शिरोळ - येथील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या ट्रस्टच्या वार्षिक सभेच्यावेळी ट्रस्टमध्ये समाजाच्या ठराविक नागरिकांना सभासद केल्याच्या कारणावरून दोन गटांत हाणामारी झाली. या वेळी बंदोबस्तास आलेल्या पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. दरम्यान, पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत समाजातील सर्व बांधवांना ट्रस्टचे सभासद करून घेण्याचे ठरल्यावर ट्रस्टची वार्षिक सभा झाली.

येथील श्री १००८ आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्या ट्रस्टच्या वार्षिक सभेत गोंधळ होणार, याची पूर्वकल्पना होती म्हणून पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता. ट्रस्टच्या यापूर्वी बोलावलेल्या सभेस उपस्थित असलेल्या जैन बांधवांना ट्रस्टचे सभासद करण्यात आल्याचा दावा विद्यमान ट्रस्टींचा होता. तथापि, केवळ शेट्टी ग्रुपने आपल्याला मानणाऱ्यांना सभासद करून समाजाची जमीन हडपण्यासाठी अनेकांना सभासद करण्यात आले नाही, असा आरोप बाळासाहेब लडगे समर्थकांनी केला होता.

वार्षिक सभेला सर्वच समाजबांधवांना प्रवेश द्यावा, या कारणावरून वादावादीस सुरवात झाली. या वेळी जैन समाजाच्या दोन गटांत बाचाबाची होऊन हाणामारी झाली. बंदोबस्तास आलेल्या पोलिसांनी लाठीमार केला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक उदय डुबल, सहायक पोलिस निरीक्षक समीर गायकवाड, रुग्गे यांनी दोन्ही गटांच्या प्रमुखांबरोबर चर्चा केली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब लडगे, अविनाश टारे, सुनील मुळे यांनी ट्रस्टचे सचिव श्रीधर शेट्टी यांच्या कामकाजावर जोरदार टीका केली. 

अध्यक्ष अशोक शेट्टी यांनी ट्रस्ट धर्मादाय आयुक्‍तांच्या नियमावलीनुसार कामकाज करीत असून, या सभेत समाजातील सर्व बांधवांना सभासद करून घेण्याचा ठराव मंजूर केल्यावर नवीन सभासद केले जातील, असे आश्‍वासन दिले.

Web Title: kolhapur news Clashes in two groups of Jain community