सनदी सेवेतील करिअरचा आज मिळणार मंत्र

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 जून 2017

कोल्हापूर - दहावी व बारावीनंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून करिअरचे असंख्य पर्याय उपलब्ध असतात. त्यातून योग्य पर्याय कसा निवडावा याविषयी पालक व विद्यार्थी यांच्या मनात संभ्रम असतो. या संबंधीच्या शंकांचे निरसन करण्यासाठी ‘सकाळ विद्या’ व ‘चाणक्‍य मंडल परिवार’ तर्फे उद्या (शुक्रवारी) चर्चासत्राचे आयोजन केले आहे. 

केशवराव भोसले नाट्यगृहात सायंकाळी ५ वाजता होणाऱ्या या चर्चासत्रासाठी विद्यार्थी आणि पालकांना विनामूल्य प्रवेश आहे.

करिअरच्या उपलब्ध पर्यायांतून नेमक्‍या पर्यायाची निवड, कल व क्षमता ओळखून निर्णय घेणे, तंत्रज्ञान क्षेत्राव्यतिरिक्त एमपीएससी, यूपीएससी तसेच वन विभाग, पोलिस अशा क्षेत्रांतील स्पर्धा परीक्षांद्वारा उत्तम करिअर घडविता येते. कष्ट करण्याची तयारी, योग्य अभ्यास पद्धत, सराव यांची तयारी असणे आवश्‍यक असते. अभ्यास, बदलत जाणारे स्वरूप व अभ्यासक्रम, विविध परीक्षांची सांगड कशी घालावी यांविषयी स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक क्षेत्रात ३३ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. एमपीएससी, यूपीएससी परीक्षांच्या ऑनलाईन कोर्सद्वारे तयारी विषयीही ते माहिती देणार आहेत.