प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी 31 जुलैपर्यंत अंतिम मुदत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

कोल्हापूर - प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचा 31 जुलै हा अंतिम दिवस असून कर्जदार, बिगर-कर्जदार शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव तत्पूर्वी सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

कोल्हापूर - प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचा 31 जुलै हा अंतिम दिवस असून कर्जदार, बिगर-कर्जदार शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव तत्पूर्वी सादर करावेत, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

भारतीय कृषी विमा कंपनीने कोल्हापूर जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित विक्रीसाठी बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. या योजनेत खातेदारा व्यतिरिक्त भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेत सर्व पिकांसाठी 70 टक्के रक्कम जोखीम म्हणून निश्‍चित केली आहे. या योजनेत पीक पेरणीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूर, भूस्सखलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई दिली जाणार आहे. या योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध आहेत. अर्जासोबत विमा प्रस्ताव तयार करतेवेळी सर्व शेतकऱ्यांनी आपले फोटो असलेल्या बॅंक खात्याच्या पुस्तकाची प्रत, आधार कार्डची झेरॉक्‍स सादर करणे आवश्‍यक आहे. 

पीकनिहाय विमा रक्कम अशी 

पिकाचे नाव सरंक्षित रक्कम प्रतिहेक्‍टर विमा हप्ता प्रतिहेक्‍टर 
भात 39000 780 
खरीप ज्वारी 24000 480 
भुईमूग 30000 600 
नागली 20000 400 
सोयाबीन 40000 800