कोल्हापूर : अपहृत मुलाचा मृतदेह सापडला खाणीत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

क्षणाक्षणाला खाणीतील पाण्यावर फिरणाऱ्या हजारोंच्या नजरा स्थिर झाल्या. रक्ताच्या डागांनी भरलेला प्रदीपचा मृतदेह बाहेर काढल्यावर नातेवाईंकासह मित्र परिवाराने एकच हंबरडा फोडला. आता प्रदीप पुन्हा येणार नसल्याने 48 तासांचे गुढ सायंकाळी उकलले

कोल्हापूर  - तब्बल 48 तासांच्या प्रतिक्षेनंतर आज सायंकाळी शाळकरी मुलगा प्रदीप सरदार सुतार (वय 9,रा.मरळी-कळे, ता.पन्हाळा) यांचा मृतदेह रंकाळा परिसरातील खाणीत सापडला. तो बेपत्ता आहे, की त्याचा घातपात झाला, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. 

रविवारी (ता.5) मरळी-कळे येथून तिसरीत शिकणाऱ्या प्रदीप सुतारचे त्यांच्या नातेवाईकाने अपहरण केले होते. त्यानंतर रंकाळा परिसरातील खाणीत त्याला टाकल्याचेही सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी इराणी आणि पतौडी खाणीत त्याचा शोध काल दुपार पासून सुरू केला होतो. स्क्‍यूबा डायव्हर द्वारे ही शोध मोहिम सुरू होती. आज सायंकाळी प्रदीपचा मृतदेह खाणीत मिळाला आणि प्रदीप जीवंत असल्याच्या आशेवर पाणी फिरले.

क्षणाक्षणाला खाणीतील पाण्यावर फिरणाऱ्या हजारोंच्या नजरा स्थिर झाल्या. रक्ताच्या डागांनी भरलेला प्रदीपचा मृतदेह बाहेर काढल्यावर नातेवाईंकासह मित्र परिवाराने एकच हंबरडा फोडला. आता प्रदीप पुन्हा येणार नसल्याने 48 तासांचे गुढ सायंकाळी उकलले.

टॅग्स