बिनधास्त डायल करा '1064'; चित्रफितिद्वारे लोकांत जनजागृती

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

कोल्हापूर: सरकारी कार्यालयातील लाचखोरी रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता कडक पावले उचलली आहेत. लाच मागणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात लोकांनी बिनधास्तपणे तक्रार द्यावी यासाठी व्हॉटस्‌अपसह इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक चित्रफितच या विभागाने 'व्हायरल' केली आहे, ज्यात 'बिनधास्त डायल करा 1064' असे आवाहन करण्यात आले आहे.

कोल्हापूर: सरकारी कार्यालयातील लाचखोरी रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता कडक पावले उचलली आहेत. लाच मागणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांविरोधात लोकांनी बिनधास्तपणे तक्रार द्यावी यासाठी व्हॉटस्‌अपसह इतर सोशल मिडीयाच्या माध्यमातून एक चित्रफितच या विभागाने 'व्हायरल' केली आहे, ज्यात 'बिनधास्त डायल करा 1064' असे आवाहन करण्यात आले आहे.

अलिकडे सरकारी कार्यालयातील लाचखोरीचे प्रमाण वाढले आहे. मोबाईल संभाषणाद्वारे आपण फिर्यादीला आपण आयताच पुरावा उपलब्ध करून देत आहोत याची जाणीव असूनही अधिकारी, कर्मचारी लाच घेण्यापासून परावृत्त झालेले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातच गेल्या तीन दिवसांत चार ते पाच सरकारी कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक केली आहे. लाच देऊ नका, घेऊही नका, लाच मागणऱ्या विरोधात थेट तक्रार करा असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वारंवार करूनही हे प्रकार थांबलेले नाहीत.

आता लाचखोरी रोखण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संदीप दिवाण यांनी एक मिनिटाची चित्रफितच तयार केली आहे. यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांची भुमिका आहे. एक ज्येष्ठ नागरीक आपले सरकारी कार्यालयातील काम होत नसल्याची तक्रार घेऊन श्री. अनासपुरे यांच्याकडे येतात. प्रत्येक वेळी कामात काहीतरी त्रुटी काढली जात असल्याची तक्रार ते ज्येष्ठ नागरीक श्री. अनासपुरे यांच्याकडे करतात. त्यावर श्री. अनासपुरेच या ज्येष्ठ नागरीकांना तुम्ही 'बिनधास्त डायल करा 1064' असे सांगतात. असा आशय असलेली ही चित्रफीत या विभागाने सोशल मिडीयावर 'व्हायरल' केली आहे. '1064' हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा टोल फ्री नंबर आहे.

लाचखोरी रोखण्यासाठी वेगवेगळे उपाय होत असताना हा नवा जनजागृतीचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. दूरचित्रवाणी, व्हाट्‌सअप, फेसबूक या माध्यमातून ही चित्रफीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल यासाठी या विभागामार्फत प्रयत्न होणार आहेत. या प्रयत्नातून तरी लाचखोरी थांबेल का ? हे लवकरच पहायला मिळणार आहे.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :
मराठ्यांनो, जातीय अस्मितेच्या विळख्यातून बाहेर पडा...
‘आई, तिला विचार तू का आलीस?’
तुरुंगातील 'व्हीआयपी' बडदास्त सीसीटीव्हीतून उघड
डोकलामप्रश्‍नी लवकरच तोडगा निघेल : गृहमंत्री
भाजप सुसाट; "राष्ट्रवादी' सपाट 
डेंगीचा आजपासून नायनाट
राज ठाकरे आज पुण्यात 
भाजपच्या भूमिकेमुळेच मंत्रिमंडळ विस्तार लांबला
तातडीचे कर्ज फक्त २४ हजार शेतकऱ्यांना
स्वाइन फ्लूचे अत्यवस्थचे सर्वाधिक रुग्ण पुण्यात