कोल्हापूरकरांनी अनुभवला डर्ट ट्रॅक रेसिंगचा थरार 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

कोल्हापूर - मुसळधार पाऊस, अंगाला झोंबणारा गार वारा अन चिखलमय मार्गावरील दुचाकी व चारकाची वाहनांच्या वेगाचा थरार कोल्हापुरकरांनी आज अनुभवला. मारूती सुझुकीतर्फे राष्ट्रीय पातळीवरील स्पीड रेसिंग अंतर्गत डर्ट ट्रॅकची फेरी येथे झाली. सलग चौथ्यावर्षी फेरीचे आयोजन करण्यात आले. फेरीत साठ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. 

विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते फेरीचे उद्‌घाटन झाले. याप्रसंगी उद्योजक शिवाजी मोहिते, मोटर स्पोर्टस्‌ इनकॉर्पोरेटचे जयदास मेनन उपस्थित होते. 

सुपर स्पेशल स्टेज प्रकारातील फेरी सुरू होताच मैदानाभोवती प्रेक्षकांची गर्दी जमली. दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वेगाचा थरार पाहताना अनेकांच्या भुवयाही उंचावल्या. चारचाकी गटात गतवर्षीचा हिमालयीन कार रॅली विजेता सुरेश राणा, दुचाकी गटात टीम टीव्हीएसचे तन्वीर व नटराज यांनी सहभाग घेऊन प्रेक्षकांची वाहवा मिळवली. मुसळधार पावसाने ट्रॅक चिखलमय झाला होता. तरीही चालकांनी आपले कौशल्य पणाला लावत वेगाच्या थराराची प्रचिती दिली. पुढील फेरी भोर येथे होणार आहे. पुणे येथे फेरीची सांगता होणार आहे. बेळगाव ते कोल्हापूर विभागातील रॅलीचे व्यवस्थापन इचलकरंजीतील ऑरिबिट रेसिंगचे अजित भिडे यांनी केले आहे. या वेळी राहुल पाठक, मंगेश देशपांडे, पिंकेश ठक्कर, रियाज शेख, महेश चौगुले, योगेश कागले यांनी संयोजन केले. 

पावसामुळे तिलारीनगर ऐवजी शेंडापार्क 
राष्ट्रीय पातळीवरील स्पीड रेसिंग नवव्या दक्षिण डेअर फेरीची सुरवात बंगळूरला झाली. ती 2300 किलोमीटरची आहे. यातील 75 किलोमीटरचा प्रवास कारचालक आणि दुचाकीस्वार तुर्केवाडी, तिलारीनगर (ता. चंदगड) येथे करणार होते. मुसळधार पाऊस, दाट धुक्‍यामुळे ही फेरी तेथे चालकांना पूर्ण करता न आल्याने तिचे आयोजन शेंडापार्कमध्ये करण्यात आले.