शेतीत गुंतवणुकीसाठी ‘डिस्टन्स ॲग्रिकल्चर’ची पायवाट

उदयसिंह घाटगे.
उदयसिंह घाटगे.

कोल्हापूर - शेतीत गुंतवणूक करायची असते; पण शेतकरी, गुंतवणूकदार आणि खरेदीदार यांच्यात कायदेशीररीत्या ताळमेळ साधायचा कसा, असा प्रश्‍न तयार होतो. त्यावर येथील कदमवाडीतील उदयसिंह घाटगे या तरुणाने ‘डिस्टन्स ॲग्रिकल्चर’ या कायदेशीर नियमाचा अवलंब करण्यास पुढाकार घेतला आहे. घाटगे हे स्वत: ब्रेन चेंबर ग्रुपचे संस्थापक असून, ते मेकॅनिकल इंजिनिअर आहेत. त्यांनी इस्रोसाठी सॅटेलाईट बुम डिप्लॉयमेंट सिस्टीमचा शोध लावला आहे. 

डिस्टन्स ॲग्रिकल्चर नियमानुसार शेतीत सहज गुंतवणूक होऊ शकते. त्यातील शेती उत्पादन हे परदेशातही विक्री करणे शक्‍य आहे. देशात आज अनेकांना हजारो कोटी रुपयांची गुंतवणूक शेतीमध्ये करायची आहे, पण शेतकरी वर्गात प्रत्येक सेेकंदाचा आणि स्क्‍वेअर फूट उत्पादनाचा हिशेब ठेवण्याची यंत्रणा नाही. शेतकरी आपले काम सोडून याबाबत सखोल अभ्यास करण्यास वेळ देत नाही, म्हणून असे ग्रुप शेतीमध्ये गुंतवणूक करत नाहीत. शेतीतील व्यवहार काळजीपूर्वक करावे लागतात, म्हणून सध्या मोजके प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. त्यासाठीच डिस्टन्स ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून शेतीतील मोठी गुंतवणूक येऊ शकत असल्याचे उदयसिंह घाटगे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘याचे कॉपीराईटसचे हक्क मिळाले आहेत. त्याद्वारे देशातील किंवा परदेशातील गुंतवणूकदाराला शेतीमध्ये गुंतवणूक करता येईल. त्यासाठी डिस्टन्स ॲग्रिकल्चरच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. शाहू महाराजांचे विचार आणि आचार घेऊनच काम परिपूर्ण करण्यासाठी ही धडपड सुरू आहे. कायदा, परिपूर्ण अभ्यास, वेळेच्या बांधणीतील उत्पादकता आणि हवामान हा डिस्टंस ॲग्रिकल्चरचा पाया आहे.’’  

संकेत स्थळावर माहिती
www.distanceagriculture.com या संकेत स्थळावर गेल्यानंतर शेतकरी किंवा गुतवणूकदारांनी आपली संपूर्ण माहिती नोंद करावी लागणार आहे. या नोंदणीनंतर गरजेप्रमाणे आलेल्या गुंतवणूकदारांची आर्थिक सक्षमता पाहून शेतकरी आणि गुंतवणूकदारांत करार डिस्टन्स ॲग्रीकल्चरकडून केला जाईल. या करारामुळे शेतकऱ्यांना आपले व्यवहार खात्रीशिररीत्या करता येणार आहेत. पडीक किंवा कोरडवाहू जमीन भाडे करारावर कंपनी किंवा अन्य शेतीपूरक व्यवसाय करणाऱ्याला देता येणार आहे. अशा लोकांची माहिती डिस्टंस ॲग्रीकल्चर या संकेतस्थळावर उपलब्ध झाली आहे. 

हमखास उत्पन्न देणारी सोनचाफ्याची शेती
उदयसिंह घाटगे म्हणाले, ‘‘जगात सोनचाफ्याचा जन्म भारतात झाला आहे. त्याचे सुगंधी तेल तयार करण्याची प्रक्रिया देशात वैदिक काळापासून सुरू आहे. हेच सुगंधी तेल नवीन तंत्राद्वारे काढून त्याची विक्री देशासह परदेशातही केली जात आहे. याची तंतोतंत माहिती आणि आर्थिक व्यवहार कसा होतो, याच्या माहितीपासून शेतकऱ्यांसह गुंतवणूकदारही अनभिज्ञ आहेत. याचाच एक प्रायोगिक प्रकल्प सोनतळी येथे कार्यरत आहे. देशातील नामवंत कंपन्या या प्रकल्पामधील फुले आमच्या डिस्टंन्स ॲग्रीक्‍लचरच्या माध्यमातून खरेदी करत आहेत.’’

कुर्ली-आप्पाचीवाडी येथे प्रकल्प 
उदयसिंह घाटगे यांनी २०१३ ला कुर्ली-आप्पाचीवाडी येथे डिस्टंस ॲग्रिकल्चरच्या माध्यमातून जरबेरा फुलाचे पॉलीहॉऊस, तर सोनतळी येथे सोनचाफा फूलशेती केली आहे. डिस्टन्स ॲग्रीकल्चर या संकल्पनेतून साकारलेले हे दोन्ही प्रकल्प देशातील पहिले प्रकल्प म्हणून ओळखले जात आहेत. यासाठी शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. विक्रमसिंह घाटगे, खंडेराव घाटगे यांनी मार्गदर्शन केल्याचे श्री. घाटगे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com