भारतीय चिकित्सा परिषद विषयक प्रस्तावित विधेयक दुरुस्तीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - भारतीय चिकित्सा परिषद विषयक निती आयोगाचे प्रस्तावित विधेयक दुरुस्त करा या मागणीसाठी आज डॉक्‍टरांनी काम बंद आंदोलन ठेवून मोर्चा काढला. नॅशनल इन्टिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)च्या माध्यमातून हे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. पंतप्रधान यांच्या कार्यालयाला निवेदन पाठविण्याची विनंती डॉ. सुनील पाटील यांच्या शिष्टमंडळांने केली. 

कोल्हापूर - भारतीय चिकित्सा परिषद विषयक निती आयोगाचे प्रस्तावित विधेयक दुरुस्त करा या मागणीसाठी आज डॉक्‍टरांनी काम बंद आंदोलन ठेवून मोर्चा काढला. नॅशनल इन्टिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)च्या माध्यमातून हे निवेदन जिल्हा प्रशासनाला दिले. पंतप्रधान यांच्या कार्यालयाला निवेदन पाठविण्याची विनंती डॉ. सुनील पाटील यांच्या शिष्टमंडळांने केली. 

भारतीय चिकित्सा परिषद विषयक निती आयोगाचे प्रस्तावित विधेयक दुरुस्त करण्यासाठी आज जिल्ह्यातील बीएएमएस डॉक्‍टर एकत्र झाले. काळ्या फिती लावून डॉक्‍टर मोर्चात सहभागी झाले. दसरा चौकातून त्यांनी मूक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला. सुमारे दीड-दोनशे डॉक्‍टरांचा मोर्चात सहभाग होता. आयुर्वेदिक पदवीचे विद्यार्थी-विद्यार्थीनी सहभागी होते. मूक मोर्चा असल्यामुळे डॉक्‍टरांच्या हातात त्यांच्या मागण्यांचे फलक झळकत होते.

"रिवाईज एनसीआयएसएम बील-2017'," बी.ए.एम.एस. डॉक्‍टरांचे कायदेशीर हक्क अबाधित ठेवा', "निमा फाईट फॉर युवर राईट', "बीएएमएस डॉक्‍टरो की पुकार मत छिनो हमसे हमारा अधिकार,' "बीएएमएस डॉक्‍टरांना न्याय द्या' असे फलक डॉक्‍टरांच्या हातात होते.

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर डॉ. सुनील पाटील यांनी मोर्चाचा उद्देश आणि पुढील नियोजन सांगितले. ते म्हणाले,"" केंद्‌ शासनाने 1970च्या आणि राज्य शासनाने 1961च्या कायद्यानुसार ऍलोपॅथीची औषधे देण्याचा अधिकार दिला आहे. भारतीय चिकित्सा परिषद विषयक निती आयोगाचे प्रस्तावित विधेयक तयार करण्यात आले आहे. त्यामध्ये आपल्या हक्काबाबत काहीच उल्लेख केला नाही. त्याची दुरुस्ती करून कायदेशीर अधिकार द्यावा, हे विधेयक दुरुस्त करावी यासाठी हा मोर्चा आणला आहे.'' 

यानंतर डॉ. सुनील पाटील, डॉ.ऋषीकेश जाधव, डॉ.यशपाल हुलस्वार, डॉ. बी. आर. पाटील, डॉ. मधुरा कुलकर्णी, डॉ. अरुण मोराळे, डॉ.मुकुंद मोकाशी, डॉ.शिवराज देसाई, डॉ. रणजित पाटील, डॉ.शैलेंद्र चव्हाण, डॉ.अभिजित मुळीक, डॉ.अदित्य काशीद, डॉ.नितीन देशपांडे, डॉ.मिलिंद कुलकर्णी, धन्वंतरी असोसिएशन पेठवडगावचे पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. 

देशव्यापी संघटनेतून निती आयोगाचे प्रस्ताविक विधेयक दुरुस्त करण्याची मागणी होत आहे. यासाठी सहा नोव्हेंबरला देशव्यापी धरणे आंदोलन दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर होणार आहे. या ठिकाणी सर्वांनी हेवे दावे बाजूला ठेवून जमावे, आपली ताकद दाखविण्याची वेळ आली असल्याचे आवाहन डॉ. सुनील पाटील यांनी केले.