डॉल्बीमुक्त मिरवणूक राज्यात इतिहास घडवेल - चंद्रकांत पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - कोल्हापुरातील डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक ही महाराष्ट्रात इतिहास घडवेल, असा विश्‍वास महसूल व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. पाटील यांनी ढोल-ताशा वाजवून मिरवणुकीला प्रारंभ केला. 

कोल्हापूर - कोल्हापुरातील डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक ही महाराष्ट्रात इतिहास घडवेल, असा विश्‍वास महसूल व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पूजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. श्री. पाटील यांनी ढोल-ताशा वाजवून मिरवणुकीला प्रारंभ केला. 

दरम्यान, पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘कोल्हापुरातील डॉल्बीमुक्त मिरवणूक महाराष्ट्रात इतिहास घडवेल. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक आणि डॉल्बीमुक्त साजरा करण्यात गणेश मंडळांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान आहे. डॉल्बी आरोग्यास घातक असून डॉल्बीमुक्त गणपती विसर्जनाची मिरवणूक महाराष्ट्रात इतिहास घडवेल, यात शंकाच नाही. डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्यांचा मनमुराद आनंद घेतल्याबद्दल सर्व कोल्हापूरकरांचे विशेषत: मंडळांचे आणि गणेशभक्तांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत.’’ गेल्या बारा दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात तसेच डॉल्बीमुक्त साजरा केला, याबद्दल कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, असे सांगून गणेश मंडळांनी आणि नागरिकांनी गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पाडून प्रशासनास केलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

कोल्हापूर-कोकण रेल्वेबाबत ते म्हणाले, ‘‘हा रेल्वे मार्ग जोडण्याच्या कामास गती आली असून या कामाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. आवश्‍यक निधी उपलब्ध झाला असून येत्या एक-दोन महिन्यांत काम सुरू होईल.’’  

पर्यावरणपूरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात पुढाकार घेतल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाचे तसेच शहर आणि जिल्ह्यातील सर्व मंडळांचे आभार मानले.  

यावेळी महापौर हसीना फरास, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, सूरज गुरव, तहसीलदार उत्तम दिघे, संदीप चौगुले, स्वप्नील पाटील, ॲड. धनंजय पठाडे, आर. के. पोवार, विजय देवणे, उदय गायकवाड, दिलीप देसाई उपस्थित होते.
 

देखावा ठरले आकर्षण
श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्यावतीने कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गावरील अंबाबाई एक्‍स्प्रेसचा केलेला देखावा मिरवणुकीत नागरिकांचे आणि भाविकांचे मुख्य आकर्षण ठरले.

Web Title: kolhapur news Dolby-free procurement will create history in the state