पावसाच्या सरी झेलत कोल्हापुरात शाही दसरा सोहळा

dussehra festival
dussehra festival

कोल्हापूर - पावसाच्या सरी झेलत आज येथे पारंपारिक शाही दसरा सोहळा ऐतिहासिक दसरा चौकात थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत शाहू  महाराज यांच्या हस्ते शमीपूजन करुन शाही कुटुंबातील सदस्यांनी सोने लुटताच करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले. 

श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, खासदार संभाजीराजे छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशस्वीनीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांचे परंपरागत पध्दतीने मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन केले. यावेळी पोलीस बँडच्या तालावर करवीर संस्थानचे गीत वाजविण्यात आले. दसरा महोत्सव समितीच्या वतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. पारंपारिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर कोल्हापूरच्या जनतेने अपूर्व उत्साहात सोने लूटले. यावेळी बंदुकीच्या फैरी झाडण्यात आल्या. यानंतर श्रीमंत शाहू महाराज यांच्यासह राजघराण्यातील सदस्य राजवाड्यावर परतत असतांना नागरिकांनी त्यांना सोने देण्यासाठी धाव घेतली. डोळयाचे पारणे फेडणाऱ्या या क्षणाने तत्कालिन इतिहासाची साक्ष दिली.

या सोहळयास माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अंजली चंद्रकांत पाटील, महापौर हसिना फरास, खासदार धनंजय महाडिक, आमदार सतेज पाटील, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक विश्वास नांगरे-पाटील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे, जिल्हा पोलीस प्रमुख संजय मोहीते, महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश  जाधव, म्हाडाचे चेअरमन समजितसिंह घाटगे, निवासी उप जिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे उप विभागीय अधिकारी सचिन इथापे, अतिरीक्ती पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा, डॉ. संजय पाटील, सरदार, मनसबदार यांच्यासह विविध विभागांचे मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी आणि कोल्हापूर शहरासह अनेक तालुक्यातून आलेले नागरिक स्त्री-पुरुष, लहान मुले यांनी दसरा चौक परिसर गर्दीने  फुलून गेला होता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com