पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनास यंत्रणा सज्ज ठेवा 

पर्यावरणपूरक मूर्ती विसर्जनास यंत्रणा सज्ज ठेवा 

कोल्हापूर - जिल्ह्यातील सर्व जलस्रोत प्रदूषणमुक्त करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे. गेल्यावर्षी जिल्ह्यातील नागरिक आणि तरुण मंडळांच्या पुढाकाराने दोन लाखांहून अधिक गणेश मूर्ती दान केल्या होत्या. यावर्षीही पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी सर्व यंत्रणेने नियोजन करून सज्ज राहावे व समन्वयाने काम करावे, गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी आवश्‍यक तेथे काहिली ठेवाव्यात, कृत्रिम कुंड ठेवावेत, असा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी दिले. 

पंचगंगा नदी प्रदुषण विषयक उपाययोजनेवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. 

श्री. सुभेदार म्हणाले, "" गेल्यावर्षी जिल्ह्यात 2 लाख 35 हजार गणेश मुर्ती संकलीत झाल्या होत्या. यंदाच्या गणेशोत्सवातही मोठ्या प्रमाणावर मुर्ती संकलन करुन पर्यावरण पुरक मुर्ती विसर्जन संकल्पनेत लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सर्वांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. पावित्र्य जपून गणेश मुर्तींचे विसर्जन होईल याची यंत्रणांनी दक्षता घेतली पाहिजे. जलस्त्रोत प्रदुषणपासून वाचविण्यासाठी व्यवस्थित नियोजन करावे, आवश्‍यक तेथे काहीली, कृत्रिम कुंडे निर्माण करावीत. सर्कल, तलाठी, पोलीस पाटील, कोतवाल, ग्रामसेवक यांनी गावपातळीवर एकत्रितपणे नियोजन करावे, तसेच उपविभागीय अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांनीही समन्वय ठेवावा. मुर्ती विसर्जनादिवशी तहसिलदार, प्रांताधिकारी यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील गावांना भेटी देऊन परिस्थिती शांततेत हाताळावी. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणार खेमणार म्हणाले, पंचगंगा प्रदुषण प्रश्नी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल झाली आहे. त्यानुसार उपाययोजना करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. विसर्जन काळात मोठ्या प्रमाणावर जलप्रदुषण होते ते रोखण्यासाठी गणेशमुर्ती संकलन करण्यात येत आहे, याला मोठ्या प्रमाणावर जनतेचाही पाठींबा मिळत आहे. यावर्षीही नदी प्रदुषित होणार नाही या दृष्टीने यंदाच्या गणेशोत्सवात सर्वांनीच दक्षता घेण्याची गरजआहे.गेल्या वर्षी गणेशोत्सवात मुर्ती विसर्जन संकल्पनेला जिल्ह्यातील अनेक गणेश मंडळे आणि लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल तसेच शासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या परिश्रम घेतले आहे. यावर्षीही महसूल आणि जिल्हा परिषद यंत्रणेने मुर्तीसंकलन उपक्रमात एकत्र काम करावे आणि पोलीस यंत्रणेने त्यांना सहाय्य करावे. लोकांना विश्वासात घेऊनच मुर्ती संकलनाचे आणि निर्माल्य संकलनाचे कार्य करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हाधिकारी महसूल अरविंद लाटकर यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थित होते. 

बैठकीतली ठळक बाबी 
गेल्यावर्षी जिल्ह्यात 2 लाख 35 हजार गणेश मुर्ती संकलीत 
पावित्र्य जपून गणेश मुर्तींच्या विसर्जनाची यंत्रणांनी दक्षता घ्यावी 
जलस्त्रोत प्रदुषणपासून वाचविण्यासाठी व्यवस्थित नियोजन करावे 
आवश्‍यक तेथे काहीली, कृत्रिम कुंडे निर्माण करावीत 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com