राधानगरीच्या भोवती... फिरतोय हत्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जुलै 2017

लोकांमध्ये दहशत - वाकी परिसरातून केला अभयारण्यात प्रवेश

राशिवडे बुद्रुक - पंधरा दिवसांपूर्वी काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वाकी परिसरातून हत्तीने अभयारण्यात प्रवेश केला. 

लोकांमध्ये दहशत - वाकी परिसरातून केला अभयारण्यात प्रवेश

राशिवडे बुद्रुक - पंधरा दिवसांपूर्वी काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील वाकी परिसरातून हत्तीने अभयारण्यात प्रवेश केला. 

याआधीही दोन हत्तींनी परिसरात रेंगाळून हुल्लड माजवून परतीचा प्रवास केला होता. मात्र या वेळी आलेल्या या पाहुण्याने मुक्काम वाढवलेला आहेच शिवाय त्यांने राधानगरी गावाच्या आसपास वावर सुरु केल्याने लोकांवर एक दहशत निर्माण केली आहे. राधानगरीपासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या भैरी बांबर आणि आयरेवाडीत मंगळवारी तो येऊन गेला, दिवसा जंगलात नि रात्री शिवारात पिके उद्‌ध्वस्त करू लागल्याने राधानगरीच्या भोवती त्याचे फिरणे डोकेदूखी ठरू लागली आहे.

साधारणतः दहा वर्षापूर्वी आलेल्या एका टस्कराने राधानगरी अभयारण्यात प्रवेश केला होता. तिथून तो हसणे परिसरात आल्यानंतर त्याला बाहेर काढताना एका वनकर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. पुढे त्या हत्तीलाही जीव गमवावा लागला. दोन वर्षापूर्वी आडोली पसिरात आलेल्या हत्तीने तेच केले होती. 

त्यानेही एकाचा जिव घेऊनच परतीचा प्रवास केला होता. दोघांचे नाहक बळी गेले होते. यंदा हत्तीने केलेला प्रवेश लोकांना धडकी भरवणारा ठरत आहे. खरेतर ३५१ चौरस किलोमिटरच्या या अभयारण्यात वाघ, बिबटे, गवे, अस्वले आहेत. मात्र त्यांचा अभ्यास येथील स्थानिकांना आहे. परंतू येथे नवख्या आलेल्या या पाहुणंयाचा त्याच्या स्वभावाचा अंदाज नसल्याने काय करायचे हे वन्यजिव विभागाला कळेना ना स्थानिकांना. आता तर भांडणे, हसणगाव धनगरवाडा, पाटपन्हाळा, बनाचीवाडी, रामनवाडी, भैरीबांबर येथील शेत शिवाराची धुळदाण करूनच तो पुढे सरकतो आहे. 

हत्तीचे वास्तव्य हे अभयारण्य क्षेत्रात असल्याने त्याला हाकलने हेही कायद्याचा धरून नाही. यामुळे वन्यजिव विभागालाही मर्यादा आलेल्या आहेत. होणारे पिकांचे व अन्य नुकसान पाहून त्याची भरपाई देणे एवढेच त्यांच्या हातात आहे. आत्ताच त्याने परतीचा प्रवास केला तर ठिक अन्यथा पुढे राज्य मार्गावरील जंगलात किंवा पुर्वेकडे शिरकाव केल्यास ती मोठी डोकेदूखी ठरणार आहे.

आज सायंकाळी त्याने फेजीवडेच्या डोंगरमाथ्यावरील शेती आणि न्यू करंजे येथील घरांच्या आडोशांचे नुकासान केले. याच परिसरात त्याचा आजचा मुक्काम राहण्याची शक्‍यता आहे. त्याचे इथून माघारी फिरणे जितके फायद्याचे ठरेल त्याहून अधीक तोट्याचे त्याचे इथून पुढे सरकणे असेल हे निश्‍चीत.

भय कायम राहणार
राधानगरी - अभयारण्य क्षेत्रात वावर असलेल्या हत्तीकडून आता पिकांची हानी सुरु झाल्याने शेतकरी कुटुंबात अस्वस्थतता पसरली आहे. वाकी घोलातून हत्तीने मंगळवारी राधानगरी वनक्षेत्रात शिरकाव केला आहे. सध्या तो रामनवाडी परिसरात आहे. एकीकडे हत्तीचा पिकांची हानी करीत अभयारण्य क्षेत्रात वावर आणि दुसरीकडे वाड्या वस्त्यात भयाचे सावट तर ऐन पावसाळ्यात जोखीम पत्करून वन्यजिव विभागाच्या पथकाकडून हत्तीची शोधमोहीम सुरुच आहे. हत्ती अभयारण्य क्षेत्रातून बाहेर जाईपर्यंत वन्यजिव विभागाच्या कर्मचाऱ्यांची दमछाक सुरु राहणार आहे. वन्यजिव विभागाच्या शोध पथकाला केवळ माग काढण्याचीच जोखीम घ्यावी लागत आहे. हत्तीचे अभयारण्यात वास्तव्य असेपर्यंत इथल्या वाड्यांवर भय कायम असणार आहे.

सध्या हत्ती राधानगरी शेजारी असलेल्या आयरेवाडी, हुडा परिसरात आहे. दिवसा जंगलात व रात्री मनुष्य वस्तीजवळील शेतात येत असल्याने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ज्यांचे नुकसान होईल त्यांचे पंचनामे सुरु आहेत. जंगल हे प्राण्यांचे आश्रयस्थान असल्याने कार्यवाही करणे कायद्याबाहेर आहे. तरीही आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत.
- ए. डी. पाटील, सहा. वनसंरक्षक राधानगरी

पश्चिम महाराष्ट्र

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरसोयींमुळे सर्वसामान्य नागरिकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांसह त्यांच्या...

02.39 AM

कऱ्हाड - मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत जागर युवा संवाद कार्यक्रमाद्वारे...

01.39 AM

सोलापूर - प्राप्त स्थितीशी सामना करत समर्थ बनून सक्षम व उद्योजिका बनण्याचा कानमंत्र लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयातील...

12.24 AM