संप मागे घेण्याचा निर्णय आत्मघातकी : एन. डी. पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 जून 2017

कोल्हापूर : 'मांडलेले प्रश्‍न न सुटताच आंदोलन मागे घेतल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. संप मागे घेण्याचा निर्णय आत्मघातकी आहे', अशा शब्दांत ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी टीका केली.

कोल्हापूर : 'मांडलेले प्रश्‍न न सुटताच आंदोलन मागे घेतल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. संप मागे घेण्याचा निर्णय आत्मघातकी आहे', अशा शब्दांत ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी टीका केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चार तास झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी त्यांचा संप आज (शनिवार) पहाटे मागे घेतला. पण या निर्णयामुळे आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये फूट पडल्याचे चित्र उभे राहिले आहे. 

या निर्णयाविषयी प्रा. पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, "संप मागे घेण्याचा निर्णय आत्मघातकी आहे. गेल्या 70 वर्षांत प्रथमच शेतकरी कुणाचेही नेतृत्व न मानता स्वत:हून संघटित होऊ पाहत होता. असे असताना प्रश्‍न न सुटताच आंदोलन मागे घेण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाली. दूध रस्त्यावर ओतले म्हणून हळहळ व्यक्त करणारे गेली दोन वर्षे लाखो क्विंटल कांदा शेतात कुजून गेला, तेव्हा कुठल्या बिळात लपले होते? तुरीची वेळेत खरेदी झाली नाही म्हणून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले, तेव्हा ही कळकळ का व्यक्त झाली नाही?'' 

दरम्यान, 'कर्जमाफी झालीच पाहिजे' अशी मागणी करत संभाजी ब्रिगेड आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी इस्लामपूर येथे कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले. यावेळी या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सदाभाऊ खोत यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले.

#शेतकरीसंपावर

शेतकऱ्यांचा संप मागे; कर्जमाफीसाठी समिती

शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलेली आश्वासने

शेतकऱ्यांच्या पदरात पडले काय?; किसान सभा असमाधानी

सत्तर टक्के मागण्या मान्य झाल्याने संप मागे: धोर्डे