जाचक अटीमुळे पावणेदोन लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार : मुश्रीफ

hasan mushrif
hasan mushrif

कोल्हापूर : राज्यसरकाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून हंगाम निहाय कर्ज वाटप,खावटी कर्ज वाटप आणि केंद्र सरकारच्या कर्जमाफी योजनेतून अपात्र असलेले सुमारे 1 लाख 75 हजार शेतकरी अपात्र ठरविले जात असल्याने जिल्ह्यातील या शेतकऱ्यांचे सुमारे 350 कोटी रुपयांचे अर्थिक नुकसान होणार आहे. कर्जमाफीच्या या जाचक अटी दूर कराव्यात अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय बंद पाडू, असा इशारा कोल्हापूर जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिला.

हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यशासनाने खरे तर उदारहस्ते कर्जमाफी द्यायला हवी होती. पण कमीत कमी कशी कर्जमाफी करता येईल याकडे शासन कटाक्षाने लक्ष देत आहे. जिल्हा बॅंक हंगामनिहाय कर्जवाटप करते. पण राज्यशासन कर्जमाफी करताना अर्थिक वर्षे 1 एप्रिलपासूनचा निकष लावल्याने मोठ्या प्रमाणात शेतकरी चंचित राहणार आहेत. हा फार मोठा अन्याय शेतकऱ्यांवर होणार आहे. त्याचबरोबर जिल्हा र्बॅक देत असलेले खावटी कर्जही कर्जमाफीतून वगळले आहे. त्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकरी वर्गांवर अन्याय करणारे हे शेतकरी आहेत. 2009 ला कर्जमाफी मिळालेल्या 48 हजार शेतकऱ्यांना 2012 मध्ये अपात्र ठरवून त्यांची 112 कोटीची कर्जमाफी रद्द केली. या शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आले.अधिकारी वर्ग ठरवून जाचक नियम व अटी लाउन शेतकऱ्यांना कर्जमाफीतून वगळ्याचा प्रयत्न करत आहेत. राज्यात भारनियमन सुरु आहे. ऑनलाईन अर्ज सरकारपर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे या कर्जमाफी अर्जासाठी मुदतवाढ तर मिळालीच पाहीजे.पण या जाचक अटी राज्यशासनाने दुर करायला हव्यात.

कमीत कमी कर्जमाफी देणाऱ्या अधिकाऱ्याला बक्षीस
राज्यशासनाने कर्जमाफी जाहीर केली असली तर यामध्ये अनेक जाचक अटी लावल्या आहेत. अधिकारी वर्ग कटाक्षाने कमीत कमी कर्जमाफी कशी देता येईल. यादुष्टीनेच काम करत आहेत. त्यांना मुख्यंमत्र्यांनी बहुतेक बक्षीसे जाहीर करावीत. त्यामुळे अनेक शेतकरी वर्गावर अन्याय सुरु आहे. सर्वोच्च अधिकारी तर मुख्यमंत्र्याची शाबासकी मिळविण्यासाठी कर्जमाफीच्या यादीला कात्रीच लावत आहेत. 25 हजार ते दीड लाखापर्यंतचे कर्जमाफ करण्याचा निर्णय आम्हाला मान्य आहे. पण यामध्ये सर्व थकबाकीदारांना त्याचा लाभ झाला आहे, अशी मागणीही जिल्हाबॅकेंचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली.

शेतकऱ्यांच्या अब्रुचे धिंदवडे काढण्यासाठीच चावडीवाचन
हसन मुश्रीफ म्हणाले,शेतकरी कर्जबाजारी आहे. त्याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.पण कोणाला किती कर्जमाफी झाली त्यांचे चावडीवाचन करुन शेतकऱ्याच्या अब्रुचे धिंदवडे काढण्याचा प्रयत्न सरकार करत आहेत. अशाप्रकारच्या चावडीवाचनामुळेही अनेक शेतकरी कर्जमाफीच्या योजनेपासून वंचित राहू शकतात. राजकीय आकसापोटी एखाद्या गरीब, गरजू शेतकऱ्याच्या कर्जमाफीवरही आक्षेप घेतला जाऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अब्रुचे धिंडवडे काढण्याचे प्रयत्न सरकारने थांबवावेत.

पालकमंत्र्यांना भेटणार
सरसकट कर्जमाफी करावी, जाचक अटी काढून टाकाव्यात 2009 च्या कर्जमाफीत अपात्र असलेल्या त्या 48 हजार शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, यासह प्रमुख मागण्यांसाठी लवकरच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट व्यापक शिष्टमंडळाच्यावतीने घेण्यात येईल. मुख्यमंत्र्यांची भेट घेउन त्यांनाही या मागण्यासंदर्भात माहीती देऊ, पण या मागण्या मान्य झाल्या नाही तर मात्र जिल्हाधिकारी कार्यालय बेमुदत बंद पाडू, असा इशाराही हसन मुश्रीफ यांनी दिला. या पत्रकार परिषदेस संचालक आर. के. पोवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप चव्हाण आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com