खत कारखाना सक्षम करा, संघाला उर्जितावस्था द्या 

खत कारखाना सक्षम करा, संघाला उर्जितावस्था द्या 

कोल्हापूर -  संघाची खत निर्मिती कारखाना सक्षम करावी, संघाच्या ज्या शाखा कमकूवत आहेत, त्या सक्षम करून संघाला उर्जितावस्था द्यावी. तसेच शेतकरी संघावर आणि संचालकांच्या कामावर आक्षेप घेणाऱ्या सुरेश देसाई यांचे सभासदत्व रद्द करावे, असा ठराव आज करण्यात आला. दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे आज शेतकरी सहकारी संघाची 77 वी वार्षिक सभा झाली. सभेत सभासदांनी 1 ते 10 विषय मिनिटात मंजूर करण्यात आले. अध्यक्ष युवराज पाटील अध्यक्षस्थानी होते. 

संघाचे काही संचालक व युवराज पाटील यांचे अध्यक्षपद रद्द होणार यावरून चाललेल्या प्रकरणामुळे यंदाची सभा लक्षवेधी ठरली होती. मात्र, संघाला झालेला फायदा व सुरू असलेल्या कामामुळे ही सभा खेळीमेळीत झाली. 

युवराज पाटील म्हणाले, ""संघाच्या कामकाजात काटकसर करून संघाला 1 कोटी रुपयांपर्यंत नफा मिळवून दिला आहे. 2011 पासून संघाच्या प्रगतीचा आलेख चढता राहिला आहे. 2012-2013 पासून संघाला "अ' ऑडिट वर्ग मिळत आहे. त्यामुळे यावषीही सभासदांना 12 टक्के लाभांश दिला जाणार आहे. रुकडी कारखान्यात 18:18:10 हे खत तयार केले आहे. याला चांगला प्रतिसाद आहे. जिल्हा बॅंकेचे 2 कोटीचे कर्ज परत केले आहे. काही इमारतील जुन्या होत्या. त्याचे नुतनीकरण करून भाड्याने दिल्या आहेत. कामगारांना महागाई भत्ता 1500 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. संघाच्या गैरव्यवहाराबाबत काही गोष्टी बोलल्या गेल्या. ज्यांनी संघ डबघाईला आणला तेच लोक टिका करत आहेत. पण भविष्यातही टिका होतेय म्हणून थांबणार नाही. तर, पुढील वर्षी दोन कोटींपर्यंत नफा मिळविल्या शिवाय राहणार नाही,'' असेही युपाटील यांनी सांगतले. 

उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर म्हणाले, "" संघाची बदमानी करणाऱ्यांनी स्वतःला आवरले पाहिजे.'' 

नामदेव चांदणे, पी. बी. पवार, आकाराम पाटील यांनीही संघाची होणारी बदनाम थांबविण्याचे आवाहन करून संघाच्या शाखा सक्षम कराव्यात अशी मागणी केली. 

दरम्यान जादा गुळ पुरवठा करणाऱ्या अविनाश चौगले (वळीवडे), पंचायत समिती सदस्य मोहन श्री. पाटील व शिवाजी पां. पाटील (रा. पाडळी खुर्द) यांचा सत्कार करण्यात आला. व्यवस्थापक आप्पासो निर्मळ यांनी अहवाल वाचन केले. 

संचालक आण्णासाहेब चौगुले, जी. डी. पाटील, मानसिंगराव जाधव, यशवंतराव पाटील, बाळकृष्ण भोपळे, व्यंकाप्पा भोसले, सुमित्रादेवी शिंदे, शोभना शिंदे, अमरसिंह माने, शिवाजी कदम उपस्थित होते. 

सुरेश देसाईंचे सभासदत्व रद्द कराव, निषेध 
सुरेश देसाई यांनी संघ आणि संचालकांवर टीका करून बदमानी केली आहे. त्यामुळे सुरेश देसाई यांचा निषेध करत त्यांच सभासदत्व रद्द करावी असा ठराव नंदकुमार पाटील यांनी केला. याला मारूती पाटील (नणुंद्रे ) यांना अनुमोदन दिले. 

..मग पैसे का भरले-देसाई 
अशा पध्दतीने कोणत्याही सभासदाचे सभासदत्त्व रद्द करता येत नाही. मी केलेले आरोपी चुकीचे व दिशाभूल करणारे होते तर मग अध्यक्ष युवराज पाटील यांनी भुविकास बॅंकेच्या थकबाकीपोटीची 30 लाख रूपयांची रक्कम का भरली ? हा प्रश्‍न आहे. संघातील अपप्रवृत्तीविरोधातील आपला लढा हा असाच सुरू राहील, अशी प्रतिक्रिया संघाचे माजी संचालक सुरेश देसाई यांनी व्यक्त केली. आजच्या सभेत श्री. देसाई यांचे सभासदत्त्व रद्द करण्याचा ठराव झाला, त्या पार्श्‍वभुमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. 

थकीत रक्कम वसुल करणार 
कर्नाटक येथील रायबागमधील डी. के. चव्हाण व विरधवल निंबाळकर या कारखान्याकडे संघाचे थकीत 55 लाख रकमेची आहे. वसुलीसाठी संघाने दावे दाखल केले आहेत. हे दावे मागे घ्यावेत, अशी मागणी एका संचालकांने केली. पण, हे दावे मागे घेतले तर संचालक मंडळाला जबाबदार धरले जाईल. त्यामुळे हे कर्ज सहकारी न्यायालयामार्फत वसूल करण्यासाठी प्रयत्न केले जातील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com