फूड सप्लीमेंटरी, औषधांची बेकायदा विक्री 

फूड सप्लीमेंटरी, औषधांची बेकायदा विक्री 

कोल्हापूर - शरीराचे वजन वाढविण्यास कारणीभूत ठरणारे फूड सप्लीमेंटरी स्टेरॉईड तसेच हार्मोन्सची मोरेवाडी येथे बेकायदा विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उधडकीस आला आहे. अन्न. औषध प्रशासनाने कोरेनगर येथे छापा टाकून फूट सप्लीमेंटरी व औषधांचा सुमारे अडीच लाखांचा साठा अन्न, औषध प्रशासनाने जप्त केला. अभय बॉडीटेक चालविणारे अभय प्रेमजी सावंत यांच्या घरी छापा टाकून कारवाई झाली. 

जिमला जाणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढ झाली आहे. तेथील ट्रेनर (प्रशिक्षकाला) हाताशी धरून भेसळयुक्त प्रोटिन्स गळ्यात मारणारे काही एजंट आहेत. अभय बॉडीटेक येथे आयात केलेले डायट्री फूट सप्लीमेंट,स्टेरॉडाईडस, हार्मोन्सची ऑनलाईन विक्री होत असल्याचे निदर्शनास आले. सावंत यांच्याकडे अन्न, औषधचा परवाना नसल्याचेही उघड झाले. सखोल तपासणी केली असता डायट्री फूड सप्लीमेंटरीचे पाच नमुने सीलबंद केले. औषध निरीक्षकांनी दोन लाख 46 हजार 536 रूपयांचा औषधांचा साठा जप्त केला. फूड सप्लीमेंटची विक्री होऊ नये यासाठी सावंत यांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले. फूड सप्लीमेंटवर आयात करणाऱ्याचे नाव व पत्ता नमूद नसल्याने हा साठा गैरमार्गाने देशात येत असल्याचे स्पष्ट झाले. औषधे व सौंदर्य प्रसाधने कायद्यातंर्गत सावंत यांच्यावर करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे. फूड सप्लीमेंटचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल मिळताच संबंधितावर कारवाई करणार असल्याचे अन्न. औषधने म्हंटले आहे. 

अन्न सुरक्षा अधिकारी बिभिषण मुळे, श्रीमती श्‍यामल महिंद्रकर, सचिन बुगड, बुगड आदि सहभागी झाले. श्रीमती मनिषा जौंधाळ पाटील सहाय्यक आयुक्त औषधे तसेच मोहन केंबळकर सहाय्यक आयुक्त अन्न. यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली. 

20 दिवसांत पाच किलो वजन वाढ 
हार्मोन्समुळे वीस दिवसांत पाच ते सहा किलो वजन वाढत असल्याचे अन्न औषधचे सहाय्यक आयुक्त केंबळकर यांनी सांगितले. स्टेरॉईड आणि हार्मोन्समुळे किडनी आणि हृदयावर परिणाम होऊ शकतो. पटकन शरीरयष्टी तयार करण्याच्या नादात तरूण यास बळी पडतात. अभय बॉडिटेकचा सावत हा उत्तर प्रदेश आणि दिल्लीहून औषधे मागवत होते. ऑनलाईन ऑर्डर घेतली की कुरियरद्वारे पोहोच करायचा. अलीकडे ग्राहकांच्या संख्येतही वाढ झाली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com