कृषी विभागाकडील निधी परत जाऊ नये

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

कोल्हापूर - कृषी विभागाकडील उपलब्ध निधी परत जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. ऑक्‍टोबरपर्यंत सर्व कामे सुरू झाली पाहिजेत, मिळणाऱ्या निधीचा विनियोग संपूर्णत: त्याच वर्षी होईल, याची खबरदारी घ्या, असा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आज दिल्या. 

कृषी विभागाकडील विविध योजनांची जिल्हास्तरीय कार्यकािरणी समित्यांची बैठक ‘आत्मा’ सभागृहात झाली. या वेळी ते बोलत होते.

कोल्हापूर - कृषी विभागाकडील उपलब्ध निधी परत जाणार नाही, याची दक्षता घेतली पाहिजे. ऑक्‍टोबरपर्यंत सर्व कामे सुरू झाली पाहिजेत, मिळणाऱ्या निधीचा विनियोग संपूर्णत: त्याच वर्षी होईल, याची खबरदारी घ्या, असा सूचना जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी आज दिल्या. 

कृषी विभागाकडील विविध योजनांची जिल्हास्तरीय कार्यकािरणी समित्यांची बैठक ‘आत्मा’ सभागृहात झाली. या वेळी ते बोलत होते.

श्री. सुभेदार म्हणाले, ‘‘गतिमान पाणलोट विकास अंतर्गत गतवर्षी ३ कोटींचा निधी परत गेला आहे. वेळेत नियोजन न झाल्याने निधी हा निधी परत गेला. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संदर्भात इन्श्‍युरन्स कंपन्यांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित राहत नाही ही गंभीर बाब आहे.’’

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक एस. जी. किणिंगे, प्रकल्प संचालक डॉ. हरिष जगताप, कृषी उपसंचालक सुरेश मगदुम, कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, एन. ए. आर. सी.चे संचालक एन. वाय. पाटील उपस्थित होते. 

उन्नत शेती समृद्ध
उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान बैठकीत २५ मे ते ८ जून या कालावधीमध्ये उन्नत शेती समृद्ध शेतकरी पंधरवडा साजरा करण्यात आला. पंधरवड्यात १११२ गावांमध्ये ७७ शास्त्रज्ञ, १०२० मार्गदर्शक अधिकारी आणि १४४४ प्रगतशील शेतकरी यांनी मार्गदर्शन केले हाते. कृषीसाठी ५७.५३ लाख तर कृषी संलग्न विभागासाठी ८.१५ लाखाची तरतुद आहे. रेशीम विकाससाठी ३.५५ लाखाची मागणी आहे. तर उपवनसंरक्षक कोल्हापूर वन विभाग यांनी २ लाखाची मागणी केली आहे. 

शाश्वत शेती
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत ५० शेतकऱ्यांचा ५० एकर क्षेत्राचा एक गट या प्रमाणे हे अभियान राबविण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात ३० गट मंजूर करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.

स्वयंचलित हवामान केंद्र
महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राच्या उभारणीसाठी स्कायमेट वेदर सर्व्हीसेस प्रा. लि.  या कंपनीची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात ७६ महसूल मंडळांपैकी २४ ठिकाणी केंद्रांच्या उभारणीचे काम पूर्ण होत आहे. 

अन्न सुरक्षा
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान-कडधान्य या योजनेचा उद्देश जिल्ह्यात कडधान्य पिकाचे क्षेत्र व उत्पादन, उत्पादकता वाढविणे आणि शेतकऱ्यांना या पिकातील सुधारीत तंत्रज्ञानाची माहिती दिली जाईल. 

कृषी अभियांत्रिकी
कृषी उन्नती योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरणासाठी २०१७-१८ मध्ये ५४४ औजारे मिळाली आहेत. यासाठी सुमारे साडे तीन हजार अर्ज आले आहेत. यातून लकी ड्रॉ पध्दतीने लाभार्थी निवडण्यात येणार आहेत. 

शाश्वत शेतीसाठी
जिल्ह्यातील मुमेवाडी (ता. आजरा), कासार कुतळे, आपताळ  (ता. राधानगरी), मजले (ता. हातकणंगले), पैझारवाडी (ता. पन्हाळा) या सहा गावांची शाश्वत शेतीसाठी निवड केली आहे. 

मागेल त्याला शेततळे
मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्गत ६१ कामे पूर्ण झाली असून  ६६ कामे सुरू झाली आहेत. जिल्ह्याला उद्दिष्ट ४०७ शेततळ्यांचे असून या योजनेमधील कामांची गती वाढविण्याची गरज जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी व्यक्त केली.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना
या योजनेंतर्गत  २०१४-१५ मध्ये १२३ प्रस्ताव विमा कंपनीला पाठविण्यात आले होते, त्यापैकी ३८ प्रस्ताव नामंजूर झाले. २०१५-१६ मध्ये ५ प्रस्ताव नामंजूर झाले.

प्रधानमंत्री पीक विमा
प्रधानमंत्री पीक विमा योजना ही कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी एेच्छिक आहे. या योजनेमध्ये ८९०५ कर्जदार शेतकरी तर १४३८ बिगर कर्जदार शेतकरी सहभागी आहेत. २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात एकूण २० लाख ५२ हजार रुपयांची रक्कम विविध शेतकऱ्यांना विम्यापोटी देण्यात आली आहे.