एमआयडीसीच्या पहिल्या फाट्यावर कचऱ्याने स्वागत 

एमआयडीसीच्या पहिल्या फाट्यावर कचऱ्याने स्वागत 

नागाव - देशात स्वच्छ भारत अभियान राबवण्यासाठी सरकार प्रयत्न करत असतानच कोल्हापूर उद्योग विश्‍वाचे प्रमुख केंद्र असलेल्या शिरोली औद्योगिक वसाहतीच्या( एमआयडीसी) प्रवेश व्दाराजवळच तब्बल 500 मिटर कचऱ्याच्या ढीगाची लांब रांग लागली आहे. नागाव ग्रामपंचायत उघडपणे तर पुलाची शिरोली ग्रामपंचायत चोरून कचरा टाकत असल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. 

विशेष म्हणजे शिरोली व नागाव ग्रामपंचायतीमध्ये महाडिक गटाच्या वर्चस्वामुळे अप्रत्यक्ष भाजपाची सत्ता आहे. ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य भाजपचेच आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही शिरोलीतच आहे. अशा परिस्थितीत स्वच्छ भारत अभियानातून निर्माण झालेली ही परीस्थिती खेदाची मानली जात आहे. कचऱ्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरच्या ग्रामस्थांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. कचऱ्यामधून येणाऱ्या प्लास्टिक पिशव्या वारंवार जाळल्या जात असल्याने निर्माण होणाऱ्या धुराच्या लोटामुळे वाहतूकदारांनाही त्रास होत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "स्वच्छ भारत अभियान " या उपक्रमातून शिरोली, नागाव व शिये या ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध झाला. या निधीतून सर्व ग्रामपंचायतीनी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी खरेदी केल्या.पण एकाही ग्रामपंचायतकडे कचऱ्यासाठी डंपिंग ग्राऊंड उपलब्ध नाही. परीणामी शिरोली ग्रामपंचायत पंचगंगा नदी किनारी, नागाव ग्रामपंचायत महामार्गालगत व शिये ग्रामपंचायत नदी वेसकडे कचरा टाकत आहे. शिरोली ग्रामपंचायत दररोज सहा - सात टन व नागाव ग्रामपंचायत दीड - दोन टन कचरा गोळा करते. नागावचा संपूर्ण कचरा महामार्गालगत टाकला जातो. शिरोलीच्या घंटागाडी या ठिकाणी चोरून कचरा टाकत आहेत. यामुळे शिरोली औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार कचरामय झाले आहे. 

आश्‍वासन हवेतच 
शिरोली मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशन ( स्मॅक ) ने याबाबत नागावचे सरपंच अशोक ऐतवडे यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र पर्यायी जागा शोधून लवकरात लवकर महामार्गालगत टाकण्यात येणारा कचरा बंद करू,असे आश्‍वासन सरपंचांनी दिले, त्यालाही आता चार महिने झाले. 

कचऱ्यामुळे धुराचे लोट 
कचरा गोळा करताना कचऱ्याची ओला व सुका कचरा अशी विभागणी होत नाही. परीणामी सुका कचरा जाळल्यानंतर ओल्या कचऱ्यामुळे केवळ धुराचे लोट हवेत जात असतात.यामुळे वाहन चालवताना वाहनधारकांना त्रास होत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com