अहवाल वाचण्याचा महादेवराव महाडिक यांना अधिकार काय?

सुनील पाटील
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

गोकुळमध्ये हुकुमशाही: 34 प्रश्नांची उत्तर दिली नाहीत

कोल्हापूर : आपल्याला संघाचा अहवाल मिळाला का? अहवालातील 1 ते 18 ठराव मंजूर काय? म्हणत अधिकार नसताना माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा दूध संघाची (गोकुळ) सभा गुंडाळली. जे महाडिक संघाचे संचालक नाहीत, त्यांना अहवाल वाचायचा अधिकार दिला कोणी? अस संतप्त सवाल सभासदानी केला.

माजी आमदार पी. एन. पाटील यांनी संघाच्या 55 वर्षाचा गौरवशाली इतिहास सांगितला. पण हाच इतिहास मातीत घालण्याच काम महाडिक यांनी केल्याची टीका यावेळी झाली. सभासदानी 34 लेखी प्रश्न विचारले होते. या एकाही प्रश्नांची उत्तरे न देताच गोकुळची सभा गुंडाळी. वास्तवीक सहकार कायद्यानुसार अहवाल वाचन करण्याचा अधिकार सचिवांना असतो. त्यामुळे महाडिक यांना काय अधिकार? असा सवालही उपस्थित केला. त्यामुळे संघात आता हुकुमशाही सुरु झाली आहे. सभासदांच्या हक्क मारला जात आहे, अशी टीका मारुती पाटील यांनी यावेळी केली.