दूध दरवाढ कपात मागे घेणे अशक्‍य 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर -  गायीच्या दूध खरेदीत कपात केलेल्या दरात पुन्हा वाढ करणे अशक्‍य आहे, असे मत दूध संघांच्या प्रतिनिधींनी मांडले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) ताराबाई पार्क येथील कार्यालयात आज झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील दूध संघ प्रतिनिधींच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. आजच्या बैठकीत पुढे काय करायचे याबाबत निर्णय झाला नसल्याने बुधवारी (ता. 8) पुन्हा बैठक होणार आहे. 

कोल्हापूर -  गायीच्या दूध खरेदीत कपात केलेल्या दरात पुन्हा वाढ करणे अशक्‍य आहे, असे मत दूध संघांच्या प्रतिनिधींनी मांडले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) ताराबाई पार्क येथील कार्यालयात आज झालेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील दूध संघ प्रतिनिधींच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. आजच्या बैठकीत पुढे काय करायचे याबाबत निर्णय झाला नसल्याने बुधवारी (ता. 8) पुन्हा बैठक होणार आहे. 

"गोकुळ'ने गायीच्या प्रतिलिटर दूध खरेदी दरात 2 रुपयांची कपात केली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. एकीकडे दूध दर कपात आणि दुसरीकडे ग्राहकांना जादा दराने केली जाणारी दूध विक्री यांमुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पण गायीच्या दुधाला बाजारपेठेत मागणी नाही. या दुधापासून तयार केली जाणारी पावडर आणि लोण्याचाही उठाव नाही. हे उपपदार्थ करणाऱ्या कंपन्यांकडूनही दुधाची मागणी ठप्प आहे. दुसरीकडे गोकुळसह सर्व संघांकडे गायीच्या दूध संकलनात वाढ झाली आहे. अतिरिक्त दूध जादा दराराने खरेदी करणे संघांना परवडत नाही. त्यातून हा दर कमी केल्याची चर्चाही या वेळी करण्यात आली. 

गोकुळच्या दर कपातीनंतर शेतकऱ्यांनी मात्र संघांच्या या निणर्याविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. खरेदी दरात कपात केली असली तरी विक्री दरात काहीही कपात केलेली नाही. संघांनी हेच दोन रुपये उत्पादकाला पूर्वीप्रमाणे द्यावेत, अशी मागणी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर संघ प्रतिनिधींची बैठक आज गोकुळच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात झाली. सद्य:स्थितीत दूध दरवाढ करणे शक्‍य नाही. कर्नाटकच्या धरतीवर सरकारने या दुधासाठी अनुदान द्यावे, यासाठी प्रयत्न करावेत, अशा भूमिका उपस्थित प्रतिनिधींनी मांडल्या. शासनाच्या नियमानुसार गोकुळ आधीपासूनच गायीच्या दुधाला जादा दर देत आहे. राज्यातील इतर संघांच्या तुलनेत दूध दर कपात करूनही दोन रुपये जादाच गोकुळकडून दिले जात असल्याचे मतही गोकुळच्या वतीने आजच्या बैठकीत मांडण्यात आले. 

शेतकऱ्यांना करावा लागणार संघर्ष 
शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय परवडत नाही. जे मिळते, ते पुन्हा याच व्यवसायासाठी वापरावे लागते. त्यात आता गोकुळने दूध दरात 2 रुपयांनी कपात केली आहे. त्यामुळे सध्या हे दर 25 रुपये झाले आहेत. आता राज्यातील दूध संघांनीही दर कपातीसाठी रेटा लावल्याने हे दर 21 ते 22 रुपयांपर्यंत खाली येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आता संघर्षाशिवाय पर्याय राहिलेला नाही. महानंदनेही गायीच्या दूध दरात कपात केली आहे. त्यामुळे खासगी दूध संघांनीही मोठ्या प्रमाणात दर कपात केली आहे. 
 

Web Title: Kolhapur News Gokul Milk rate issue