पानसरे खून तपास प्रकरणी पोलिस अपयशी 

शिवाजी यादव
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनाला तीन वर्षे पूर्ण झाली तरी पोलिसांचा तपास अर्धवट आहे. खूनातील सुत्रधारला पोलिसांनी पकडलेले नाही. त्यामुळे तपासाबाबत पोलिस यंत्रणा गाफिल आहे. असा आरोप करीत आज विविध पक्षीय संघटना तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खूनाला तीन वर्षे पूर्ण झाली तरी पोलिसांचा तपास अर्धवट आहे. खूनातील सुत्रधारला पोलिसांनी पकडलेले नाही. त्यामुळे तपासाबाबत पोलिस यंत्रणा गाफिल आहे. असा आरोप करीत आज विविध पक्षीय संघटना तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी 25 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले त्यानंतर सोडून दिले. पानसरेच्या घटनेच्या तपास अपेक्षीतरित्या होत नसल्याबद्दल तीव्र शब्दात पदाधिकाऱ्यांनी नापसंती व्यक्त केली. 

भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष, लाल निशान पक्ष, जनता दल, अंधश्रध्दा निर्मुलन समिती, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी पक्षांचे प्रतिनिधी या आंदोलनात सहभागी झाले. 

उमा पानसरे, सतिशचंद्र कांबळे, अतुल दिघे, नामदेव गावडे, चंद्रकांत यादव, अनिल चव्हाण, व्यंक्काप्पा भोसले, उदय नारकर, गिरिश फोंडे, बी. एल. बरगे आदी यावेळी उपस्थित होते.

अॅड. पानसरे, डॉ. दाभोळकर, डॉ. कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांवर कारवाई झालीच पाहीजे, अशा घोषणा पदाधिकारी नेत्यांनी दिल्या. त्यानंतर सर्वच नेते कार्यकर्त्यांना पोलिसांनी पकडून पोलिस व्हॅनमध्ये घातले. यावेळी झटापटही झाली. 
आंदोलनाचे नेतृत्व उमा पानसरे यांनी केले.  

आंदोलनातील प्रमुख मागण्या अशा - 

  • फरारी आरोपी विनय पवार, सारंग अकोळकर तसेच सुत्रधारांना त्वरित अटक करा.
  • गायकवाड, तावडेंचा जामीन रद्द करण्यासाठी सबळ पुराव्यांसह ज्येष्ठ विधीज्ञांची नियुक्ती सरकारने करावी 
  • अॅड. पानसरे, डॉ. दाभोळकर खूनातील आरोपीना दहशतवादी जाहिर करावे
  • सनातन संस्थेचे जयंत अठवले यांच्या अटकेसाठी लुक आऊट नोटीस लागू करावी
  • संशयितांना पकडण्यासाठी कॉम्बींग ऑपरेशन करावे. 
Web Title: Kolhapur News Govin Pansare Murder Invistigation