महाराष्ट्र शासन जबाब दो...! 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे समता संघर्ष समितीच्या वतीने आज शिवाजी पेठेतून निघालेल्या निर्भय मॉर्निंग वॉक उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. "महाराष्ट्र शासन जबाब दो..', "मोदी सरकार जबाब दो..', "महात्मा बसवाण्णा, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांचा विजय असो...' अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला. 

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येला आज चार वर्षे पूर्ण झाली. गोविंद पानसरे यांच्या हत्येला अडीच वर्षे तर प्रा. एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येला दोन वर्षे पूर्ण झाली, मात्र मारेकऱ्यांना पकडण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी हा उपक्रम झाला. 

उभा मारुती चौकातून उपक्रमाला प्रारंभ झाला. संध्यामठ गल्ली, चंद्रेश्‍वर गल्ली, खराडे कॉलेज, शिवाजी तालीम मंडळ, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, रंकाळवेस, ताराबाई रोड, साकोली कॉर्नर, अर्धा शिवाजी पुतळा, दौलतराव भोसले शाळा आणि पुन्हा उभा मारुती चौक असा मार्ग राहिला. "तुफानातील दिवे', "मारली तू गोळी नको सांगू बढाया' अशी गीतेही या वेळी सादर झाली. 

अतुल दिघे म्हणाले, ""भारतीय राज्य घटनेने सांगितलेला समतेचा विचार उद्‌ध्वस्त करण्याचे काम सध्या सुरू आहे. न थकता येत्या काळातही हा उपक्रम सुरू ठेवू या.'' या वेळी दिलीप पवार, सुरेश शिपूरकर, व्यंकाप्पा भोसले, आर. वाय. पाटील, प्रा. डॉ. विलास पोवार, प्रा. डॉ. छाया पोवार, ऍड. अजित चव्हाण, विकास जाधव, बी. एल. बरगे, सतीशचंद्र कांबळे, वसंतराव मुळीक, सीमा पाटील, स्वाती कोरे, सतीश पाटील, ए. बी. जाधव, प्रा. सुभाष जाधव, दिगंबर लोहार, बाबूराव लाटकर, शाहीर राजू पाटील आदींसह शिवाजी पेठेतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाहीर राजू राऊत यांनी या वेळी पोवाडा सादर केला. दरम्यान, वीस सप्टेंबरला निकम पार्क (देवकर पाणंद) परिसरात हा उपक्रम होईल.