हातकणंगले तालुक्यात खोतवाडीत मतदानावेळी राडा

हातकणंगले तालुक्यात खोतवाडीत मतदानावेळी राडा

इचलकरंजी : तारदाळ (ता. हातकणंगले) ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतदानावेळी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगारांने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर खोतवाडी येथे मतदानावेळी दोन गटात किरकोळ कारणावरून राडा झाला. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते.

तारदाळमध्ये  भाजपप्रणीत आघाडी व कॉग्रेस प्रणीत आघाडीत अटीतटीची निवडणूक होत आहे. तेथे मतदानावेळी रेकाॅर्डवरील गुन्हेगाराने तलवारी नाचवित आमच्यांच गटाच्या उमेदवारांला मतदान करायचे व आमच्याच मोटारीमध्ये बसायचे अशाप्रकारे  दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारांची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण पोलीस येत असल्याची माहिती मिळताच संबंधीत पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार व त्यांच्या साथीदारांनी पलायन केले. याप्रकारांने या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

खोतवाडी गावामध्ये मतदानावेळी चक्क पोलिसांच्या समोरच दोन गटात किरकोळ कारणावरून राडा झाला. दोन्ही गटाच्या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी लाठी चार्ज केला. या राड्यामध्ये एक तरूणाच्या डोक्‍याला दगड लागल्याने तो जखमी झाला. या गावातील एका मतदान केंद्राच्या मतदान यंत्रामध्ये बिघाड झाल्याने देखील काही तणाव निर्माण झाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com