कोल्हापूर जिल्हा ग्रामपंचायत निवडणूक उपलब्ध निकाल असे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - आतापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालमध्ये करवीर तालुक्यामध्ये सरपंचपदाच्या ९ निकालापैकी ४ जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. प्रत्येकी २ जागांवर भाजप आणि शिवसेना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा पदरात पडली आहे.

कोल्हापूर - आतापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालमध्ये करवीर तालुक्यामध्ये सरपंचपदाच्या ९ निकालापैकी ४ जागांवर काँग्रेसने बाजी मारली आहे. प्रत्येकी २ जागांवर भाजप आणि शिवसेना आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा पदरात पडली आहे.

काँग्रेसने शेळकेवाडीतून रंगराव बाबुराव शेळके यांनी ३ मतांनी विजय मिळवला आहे. भाटनवाडी अमर आनंदा कांबळे, पासार्डे वंदना अशोक चौगले, हणबरवाडीतून सुप्रिया बाजीराव वाडकर यांनी बाजी मारली आहे. भाजपने कावनेतून सुनील टिपुगडे आणि सादळे-मादळेतून मिनाक्षी विजय जाधव आणि शिवसेनेच्या प्रयाग-चिखलीतून उमा संभाजी पचिंद्रे आणि सावर्डे दुमालातून सुवर्णा कुंडलिक कारंडे यांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादीला परीतेतून अक्काताई सुदाम कारंडे हि जागा मिळाली आहे.

जिल्ह्यातील अन्य निकाल असे

भुदरगड तालुका सरपंच निवड निकाल

पुष्पनगर - आर. बी. देसाई (राष्ट्रवादी), पिंपळगाव - विश्वनाथ कुंभार (राष्ट्रवादी) , मडिलगे खुर्द - गाैरी खापरे (राष्ट्रवादी),व्हनगुत्ती-श्रीकांत कांबळे,कारीवडे-ज्ञानदेव देसाई (जाधव गट),आरळगुंडी-आक्काताई देवेकर(शिवसेना)

शाहुवाडी तालुका सरपंच निवड निकाल

शाहुवाडीत सहा सरपंच शिवसेनेचे, सेना-राष्ट्रवादी आघाडी व जनसुराज्य-काँगे्रस, जनसुराज्य-राष्ट्रवादी आघाडीला प्रत्येकी एक, जनसुराज्यला एक

अमेणी- संजय आनंदा पाटील-शिवसेना, आरूळ-धाेंडीराम साेणे-शिवसेना, अंबर्डे- वैशाली माने-शिवसेना, बहिरेवाडी- लक्ष्मण खाेत-शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी, भाडळे-संभाजी पाटील-जनसुराज्य-काँग्रेस आघाडी, चरण-वनश्री लाड-जनसुराज्य, साेनाेली-पंडीत शेळके-राष्ट्रवादी, गाेगवे-विकास पाटील-सेना, हारूगडेवाडी-वैभव पाटील-सेना, करंजाेशी-सुनिता पाटील-जनसुराज्य, कातळेवाडी-सागर उगवे-जनसुराज्य-राष्ट्रवादी आघाडी.

राधानगरी तालुका दहा गावांचे निकाल जाहीर, आठ ठिकाणी राष्ट्रवादीचे सरपंच, एक जागा काँगे्रसला तर एक स्थानिक आघाडीला