गारगोटी ग्रामपंचायतीत सत्तांतर; आबिटकर आघाडीला धक्का

धनाजी आरडे
सोमवार, 28 मे 2018

गारगोटी -  येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक  निवडणुकीत राहुल देसाई व माजी आमदार के. पी. पाटील आघाडीने सरपंचपदासह १२ जागा जिंकून सत्तांतर घडविले. सत्ताधारी आमदार प्रकाश  आबिटकर यांच्या आघाडीला केवळ ५ जागावर समाधान मानावे लागले. सरपंचपदाचे उमेदवार संदेश भोपळे हे विजयी झाले.  

गारगोटी -  येथील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक  निवडणुकीत राहुल देसाई व माजी आमदार के. पी. पाटील आघाडीने सरपंचपदासह १२ जागा जिंकून सत्तांतर घडविले. सत्ताधारी आमदार प्रकाश  आबिटकर यांच्या आघाडीला केवळ ५ जागावर समाधान मानावे लागले. सरपंचपदाचे उमेदवार संदेश भोपळे हे विजयी झाले.              

गारगोटी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी ४ तर १७ जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात होते. हणबरवाडी ग्रामपंचायतीत आमदार आबिटकर गटाच्या सत्ता कायम राखण्यात धनाजी खोत यांना यश आले. तर शिंदेवाडीत राहुल देसाई - प्रा. बाळ देसाई यांच्या आघाडीस सत्ता राखण्यात यश मिळाले. निष्णप-कुंभारवाडीत आमदार आबिटकर गटाने सत्ता मिळविली. कोंडोशीत आबिटकर गटास सत्ता मिळाली मात्र सरपंचपद माजी आमदार के. पी. पाटील - सत्यजित जाधव आघाडीस मिळाले. चांदमवाडीत सत्यजीत जाधव - धनाजीराव देसाई गटास सत्ता व सरपंचपद मिळाले.

गारगोटी ग्रामपंचायतीच्या माजी आमदार के. पी. पाटील - राहुल देसाई यांच्या केदारर्लिंग शहर विकास आघाडीचे विजयी उमेदवार असे

सरपंच संदेश पांडुरंग भोपळे. सदस्य - सचिन सर्जेराव देसाई, सुकेसनी सतीश सावंत, आशाताई सुरेश भाट, रूपाली बजरंग कुरळे, जयवंत विठ्ठल गोरे, राहूल हिंदुराव कांबळे, प्रकाश शंकर वास्कर, अस्मिता नारायण कांबळे, सविता प्रशांत गुरव, अल्केश मधुकर कांदळकर, मेघा सचिन देसाई, स्नेहल विजय कोटकर.

आमदार प्रकाश आबिटकर यांच्या जोतिर्लिंग शहर विकास आघाडीचे सदस्यपदाचे उमेदवार असे -

रणधीर रघुनाथ शिंदे, स्मिता अजित चोगले, सर्जेराव विष्णू मोरे, अनिता प्रदीप गायकवाड, सुशांत सुरेश सुर्यवंशी.

हणबरवाडी ग्रामपंचायत : सरपंच - धनाजी महादेव खोत, जयवंत शंकर वडर, विजय पांडुरंग खोत, राजश्री रमेश खोत, धोंडिबा दत्तू निढोरे, संतोष सखाराम खोत, मंगल हरिबा देसाई.

शिंदेवाडी ग्रामपंचायत -  सरपंच - संगीता बाजीराव चव्हाण, शशिकांत कृष्णात घुंगरे, शोभा राजाराम चव्हाण, सुभाष नागू तोंदले, माधुरी मारुती दबडे, राजाराम कृष्णा चव्हाण, छाया निवास पाळेकर, दीपाली विजय सावंत.

निष्णप कुंभारवाडी - सरपंच - भारती विलास पाटील, संदीप शिवाजी राऊळ, छाया कृष्णा राऊळ, मारुती भाऊ कांबळे, समिधा सुनील तेलंग, सचिन कृष्णा राऊळ, पांडुरंग यशवंत तेलंग.

चांदमवाडी - सरपंच - सुषमा संजय मोरे, पांडुरंग लक्ष्मण चांदम, शिवाजी यशवंत चांदम, शोभा दिनकर मोरे, राजश्री उमाकांत चांदम, पूजा दिनकर चांदम.

कोंडोशी :  सरपंच - मारूती शामराव पाटील, सदस्य - मनोहर ज्ञानू मांगले, प्रज्ञा  प्रकाश भालेकर, प्रविण नामदेव बेळणेकर, महेश कृष्णा भुतूर्णे, जिजाबाई तुकाराम पाटील.

मौनी विद्यापीठातील क्रीडा संकुलात ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली. प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, तहसीलदार अमरदीप वाकडे, पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी, नायब तहसीलदार शीतल देसाई, व्ही. एन. बुट्टे, एच. आर. म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी प्रक्रिया पार पडली. 

Web Title: Kolhapur News Grampanchayat Election Result