राधानगरी तालुक्यात पाच गावांमध्ये सत्तांतर

राधानगरी तालुक्यात पाच गावांमध्ये सत्तांतर

राधानगरी - तालुक्‍यात लक्षवेधी ठरलेल्या कसबा वाळवे, पालकरवाडी, चांदेकरवाडी, चक्रेश्‍वरवाडी व बारडवाडी ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतरे घडली. मोठी ग्रामपंचायत असलेल्या कसबा वाळवे येथे सरपंचपदासह चार जागा काँग्रेसचे भरत पाटील व फराक्‍टे गटाने जिंकल्या तर माजी आमदार नामदेवराव भोईटे यांनी अकरा जागा जिंकून आपला वट्ट दाखवला. मात्र, भोईटे यांना स्वतःच्या गावात बहुमत सिध्द करता आले नाही. तिथे त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला.

सरवडे येथील सरपंचपदाच्या लढतीत बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, राजेंद्र पाटील, विठ्ठलराव खोराटे यांच्या महाआघाडीच्या उमेदवार मनोज्ञा दिग्वीजय मोरे या विजयी झाल्या. फेजीवडेमध्ये फारूख नावळेकर यांनी सरपंचपदासाठी बाजी मारली. 

नूतन सरपंच 
राधानगरी तालुक्‍यात थेट निवडून आलेले सरपंच असे ः कसबा वाळवे - अशोक फराकटे, सरवडे ः मनोज्ञा मोरे, फेजीवडे- फारूख नावळेकर, मालवे- संग्राम पाटील, चांदेकरवाडी- रावण खोत, चक्रेश्‍वरवाडी-प्रियांका नरके, पालकरवाडी- रूपाली पालकर, बारडवाडी- पार्वती बारड, फराळे- संदीप डवर.

तालुक्‍यातील अकरा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. पैकी दोन गावांची निवडणूक बिनविरोध झाल्याने नऊ गावांमध्ये रणधुमाळी माजली होती. आज त्या सर्व गावांची मतमोजणी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात झाली. सकाळी साडेअकरा पर्यंतच सर्व निकाल लागले. यामध्ये कसबा वाळवे, पालकरवाडी, चांदेकरवाडी, चक्रेश्‍वरवाडी व बारडवाडी ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतरे घडली. तर फेजीवडे, मालवे, फराळे येथे स्थानिक आघाड्यांना संमिश्र यश मिळाले. 

विजयी झालेले सदस्य -

कसबा वाळवे ः प्रवीण पारकर, सचिन पाटील, वैशाली पाटील, सुनील मांडवकर, अरुणा पाटील, नयना चव्हाण, केरबा कोरे, शरयू पाटील, दीपाली चांदेकर, अप्पासाहेब पाटील, शारदा कांबळे, चंद्रकला चव्हाण, भरत पाटील, सारिका कानकेकर, अक्काताई पाटील.
चांदेकरवाडी ः युवराज सुतार, प्रवीण खोत, राजश्री खोत, जयवंत खोत, बारती पताडे, अनिता खोत, बिनविरोध ः नामदेव खोत, मनीषा खोत, ज्योती खोत. 
पालकरवाडी ः प्रकाश पोतदार, अलका पालकर, विक्रम भोईटे, सुरेखा पाटील, धनाजी पोवार, कुसुम पाटील, वैशाली महेकर.
बारडवाडी ः वसंत बारड, शारदा बारड, सुनीता बारड, बळवंत बारड, रुपाली सुतार, वैसाली बारड, मोहन वांगणेकर, बापू फराकटे, सारिका एकल.
चक्रेश्‍वरवाडी ः अशोक बारड, बेबी कुसाळे, संदीप बारड, सीमा कुसाळे, तुषार करपे, मंगल वांगणेकर, ताई नरके.
फराळे ः लक्ष्मण गिरी, द्रोकोतौपदी डवर, अनिता पाटील.
फेजीवडे ः मीना पाटील, अंकुश तुरंबेकर, दत्तात्रय पोकम, संजीवनी कांबळे, अरीफ राऊत, रेश्‍मा 
कानकेकर, शब्बीरा चिडवणकर, तौफीक राऊत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com