शाहूवाडीत शिवसेनेचा भगवा

शाहूवाडीत शिवसेनेचा भगवा

शाहूवाडी -  शाहूवाडी तालुक्‍यातील ४५ ग्रामपंचायतींत स्थानिक आघाड्यांना सर्वाधिक १९ ठिकाणी यश मिळाले. शिवसेनेने १५, तर जनसुराज्याने ९ ठिकाणी वर्चस्व सिद्ध केले आहे. राष्ट्रवादी व भाजपला प्रत्येक एका ठिकाणी खाते खोलता आले. काँग्रेसला मात्र स्वतंत्ररीत्या एकाही ठिकाणी सत्ता मिळाली नाही. 

शिवसेना, राष्ट्रवादी, जनसुराज्य व काँग्रेस भाजपने गावपातळीवर सोयीच्या स्थानिक आघाड्या करत करंजफेण, शित्तुर वारुण, उदगिरी, येळाणे, कडवे, कातळेवाडी, बहिरेवाडी, भाडळे, माळापुडे, पिशवी, तुरूकवाडी, खोतवाडी, परखंदळे, बांबवडे, खुटाळवाडी, साळशी, डोणोली, कोपार्डे व माणगाव येथे यश मिळविले.

आमदार सत्यजित पाटील (शिवसेना) यांच्या पॅनेलने अमेणी, आरुळ, आंबर्डे, बजागेवाडी, भेडसगाव, गोगवे, हारुगडेवाडी, करुंगळे, खेडे, मरळे, रेठरे, सरूड, शिवारे, शाहूवाडी, उचत येथे वर्चस्व सिद्ध केले. माजी आमदार विनय कोरे (जनसुराज्य) पॅनेलने चरण, करंजोशी, कापशी, निळे, उखळू, विरळे, वरेवाडी, कोळगाव व येलूर येथे सत्ता मिळविली. येळवणजुगाईत राष्ट्रवादीने, तर घुंगूर येथे भाजपाने सत्ता मिळवून खाते खोलले. 

सरूड येथे आमदार सत्यजित पाटील ल पॅनेलने सर्व १२ जागा जिंकल्‍या. बांबवडेत विष्णू यादव यांनी कर्णसिंह गायकवाड व मानसिंग गायकवाड गटाची आघाडी करून सत्ता कायम ठेवली. भाडळेत माजी पंचायत समिती सभापती जयसिंगराव भाडळेकर यांच्या पॅनेलला धक्‍का बसला. जनसुराज्य-काँग्रेस आघाडीने येथे सर्व जागा जिंकल्या. साळशीत जिल्हा परिषद सदस्य विजय बोरगे व महादेव पाटील गटाला निसटता विजय मिळाला. कडवे येथे जिल्हा परिषद सदस्या आकांक्षा पाटील यांच्या पॅनेलने पंचायत समिती सदस्य विजय खोत, अमरसिंह खोत यांच्या पॅनेलला धक्‍का दिला.

भेडसगावला सत्ता राखण्यात जिल्हा परिषद सदस्य हंबीरराव पाटील यांना यश आले. चरणला माजी पंचायत समिती सभापती वनश्री लाड सरपंच झाल्या. बाजार समिती संचालक बाबासो लाड यांच्या पॅनेलने सत्ता राखली. कोपार्डे ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या सदाशिव पाटील यांनी सत्तांतर घडवून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शामराव कारंडे यांच्याकडून सत्ता खेचली.

करूंगळेत शिवसेनेचे माधव कळंत्रे यांनी सत्तांतर घडवून आणले. वारणा कापशीत पैलवान शिवाजी पाटील यांच्या पॅनेलने पैलवान पांडुरंग केसरे पॅनेलचा पराभव करत सत्ता कायम ठेवली. शिवारेत दादासो बारगीर-पाटील, पैलवान दामाजी पाटील यांच्या पॅनेलला पराभव पत्करावा लागला. शाहूवाडीत सभापती स्नेहा जाधव यांच्या पुतण्याचा पराभव झाला; मात्र सत्तांतर घडवून शिवसेनेची सत्ता आणली. उदय साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पृथ्वीराज खानविलकर (करंजफेण), संचालक पंडित शेळके (डोणोली) दोघेही सरपंच गावप्रमुख म्हणून यशस्वी झाले. 

१७ ठिकाणी सत्तांतर 
अमेणी, शाहूवाडी, आंबर्डे, कडवे, उचत, हारुगडेवाडी, करंजोशी, करूंगळे, कोपार्डे, कोळगाव, मरळे, माळापुडे, शिराळे वारुण, शिवारे, तुरुकवाडी, विरळे, येळाणे. 

विजयी सरपंच 
सविता पाटील (शाहूवाडी), संजय पाटील (अमेणी), धोंडिराम सोने (आरुळ), वैशाली माने (आंबर्डे), तुकाराम बजागे (बजागेवाडी), सागर कांबळे (बांबवडे), लक्ष्मण खोत (बहिरेवाडी), संभाजी पाटील (भाडळे), अमर पाटील (भेडसगाव), वनश्री लाड (चरण), पंडित शेळके (डोणोली), विकास पाटील (गोगवे), बाजीराव सावरे (धुंगूर), वैभव हारूगडे (हारुगडेवाडी), सुनीता पाटील (करंजोशी), संजय लाळे (कडवे), पृथ्वीराज खानविलकर (करंजफेण), माधव कळंत्रे (करूंगळे), नंदा कदम (कापशी), सागळ उगवे (कातळेवाडी), उषा कळंत्रे (कोपार्डे), आनंदा कांबळे (कोळगाव), विलास खुटाळे (खुटाळवाडी), बाबासो पवार (खेडे), अल्का चव्हाण (मरळे), संपदा अडसूर (माणगाव), महादेव सुतार (माळापुडे), संजय पाटील (निळे), अश्‍विनी दळवी (परखंदळे), लक्ष्मी पाटील (पिशवी), रंजना पाटील (रेठरे), राजकुंवर पाटील (सरूड), रवींद्र शेडगे (शिराळे तर्फ वारुण), शुभांगी पाटील (उचत), पांडुरंग पाटील (उदगिरी), राजाराम मुटल (उखळू), शारदा पाटील (विरळे), आबाजी भोसले (वरेवाडी), मधुकर पाटील (येळाणे), कमल पाटील (येलूर), धोंडिराम खोत (खोतवाडी).

संदीप पाटील १ मताने सरपंचपदी
साळशी येथे सरपंचपदासाठी अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत संदीप महादेव पाटील केवळ १ मताने विजयी झाले. नेत्यांच्या विरोधात तरुण आघाडी अशीच लढत येथे झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com