गगनबावडा तालुक्‍यात काँग्रेसचे वर्चस्व

गगनबावडा तालुक्‍यात काँग्रेसचे वर्चस्व

असळज - गगनबावडा तालुक्‍यातील २१ ग्रामपंचायत निवडणुकीत ५ ठिकाणी सत्तांतर झाले असून, १६ ठिकाणी सत्ता कायम राहिली आहे. स्थानिक आघाडीच्या जोरावर बहुतांशी पक्षांनी आपला करिष्मा सिद्ध केला आहे.

तालुक्‍यातील सर्वांधिक ९ ठिकाणी काँग्रेसचे,  ७ ठिकाणी भाजप, २ ठिकाणी शिवसेना व २ ठिकाणी ताराराणी आघाडीचे सरपंच झाले आहेत. तालुक्‍यातील दोन्ही जिल्हा परिषद सदस्यांना आपल्या गावात सत्तेपासून वंचित राहावे लागले आहे.  

सकाळी १० वाजता गगनबावडा येथील शासकीय मध्यवर्ती इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर मतमोजणीस प्रारंभ झाला. चार टेबलवर मतमोजणीची मांडणी केली होती. पाच टप्यात तहसीलदार रामलिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी करण्यात आली. सकाळी ११.३० च्या सुमारास अणदूर ग्रामपंचायतीचा निकाल पहिल्यांदा जाहिर झाला. पहिल्याच फेरीत असळज ग्रामपंचायतीची मतमोजणी सुरू असताना प्रभाग १ मधील मशिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या पंचायतीचा निकाल सर्वात शेवटी जाहीर करावा लागला.

तालुक्‍यात लक्षवेधी ठरलेल्या तिसंगी, शेळोशी, बावेली, जर्गी व शेणवडे या ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील यांच्या तिसंगी ग्रामपंचायतीत शिवसेनेचे बंकट थोडगे यांनी शिवसेना व भाजप युतीच्या जोरावर सरपंचपद व ६ सदस्याच्या जोरावर सत्तांतर केले. लक्षवेधी ठरलेल्या अणदूर ग्रामपंचायतीत शिवसेना भाजपच्या युतीने सत्ता घेतल्याने विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बजरंग पाटील यांना सत्तेपासून वंचित रहावे लागले.

तालुक्‍यातील मांडुकली, असळज, साळवण, खोकुर्ले, मार्गेवाडी, अणदूर, साखरी, खेरीवडे, कडवे, तळये, बोरबेट, कोदे, धुंदवडे, वेसर्डे, मणदूर व निवडे इत्यादी ठिकाणी सत्ता कायम राहिली. तालुक्‍यातील मांडुकली, खोकुर्ले, साखरी-म्हाळुंगे, धुंदवडे, असळज, शेणवडे, मणदूर, साळवण व निवडे या ९ ठिकाणी काँग्रेसचे सरंपच झाले. मार्गेवाडीत आरक्षणाअभावी काँग्रेसच्या उपसरपंचाकडे पदभार राहणार आहे. तळये, अणदूर, कडवे, जर्गी, बोरबेट, कोदे बुद्रुक, वेसर्डे या ७ ठिकाणी भाजपचे सरपंच झाले आहेत. तिसंगी व बावेली या ठिकाणी शिवसेनेचे, तर शेळोशी व खेरीवडेत ताराराणी आघाडीचे सरपंच झाले.

विजयी सरपंच  
मांडुकली-दीपाली संदीप पाटील, तळये-दिलीप केरबा भोसले, खोकुर्ले- लक्ष्मी विलास वरेकर, अणदूर- दत्तात्रय गुरव, साखरी-म्हाळुंगे- सविता शरद कोटकर, खेरीवडे- मालती एकनाथ तेली, कडवे- उषा बाबासाहेब कांबळे, बावेली- कमल तानाजी काटे, तिसंगी- शमशुद्दीन सल्लाउद्दीन उर्फ बंकट थोडगे, जर्गी- दौलतबी बादशहा म्हालदार, शेळोशी- प्रकाश राजाराम पाटील, बोरबेट-आनंदा गणपत कुडतरकर, कोदे बुद्रुक- सर्जेराव रामचंद्र पाटील, धुंदवडे- गीता सरदार शेलार, वेसर्डे-वैशाली कृष्णात पाटील, असळज- अनिता पांडूरंग पळसंबेकर, शेणवडे- सखाराम कृष्णा कांबळे, मणदूर- यशवंत दगडू जाधव, साळवण- संजय एकनाथ पडवळ, निवडे- दगडू बापू भोसले, मार्गेवाडी- रिक्‍त.

सरपंच असला तरी सत्ता नाही
निवडे ग्रामपंचायतीत सरपंच व दोन सदस्य काँग्रेसचे असले तरी भाजपचे पाच सदस्य निवडून आले आहेत. तसेच जर्गी येथे सरपंचपद व तीन सदस्य भाजपचे असले तरी चार सदस्य काँग्रेसचे निवडून आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com