पावसाचा मारा; टपोऱ्या गारा

कोल्हापूर - शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी गारांसह पावसाने हजेरी लावली. शाहू स्टेडियमवर अक्षरश: गारांचा गालिचा अंथरला होता.
कोल्हापूर - शहरासह जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळी गारांसह पावसाने हजेरी लावली. शाहू स्टेडियमवर अक्षरश: गारांचा गालिचा अंथरला होता.

कोल्हापूर - दिवसभराच्या रखरखत्या उन्हानंतर सायंकाळी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि गारांसह आलेल्या मुसळधार पावसाने शहरासह जिल्ह्यास झोडपले. अंगाची लाही लाही करणारा उष्मा कमी होऊन हवेत गारवा आला. अचानक आलेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडाली. तासाभराच्या पावसाने सर्वत्र पाणी पाणी केले. गेल्या काही दिवसांपासून उष्म्यात वाढ होऊन शहराचा पारा ४१ डिग्रीवर पोहोचला होता. आज सायंकाळी चारच्या सुमारास गारांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली. मैदाने, रस्त्यांवर गारांचा खच पडला होता. काही भागात बच्चे कंपनी, तरुणाईने भर पावसात गारा वेचण्याचा आनंद लुटला. 

रखरखत्या उन्हानंतर सायंकाळी विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा आणि गारांसह आलेल्या मुसळधार पावसाने शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले. अचानक आलेल्या पावसाने लोकांची त्रेधा उडाली. तासाभराच्या पावसाने सर्वत्र पाणी पाणी करून सोडले.

शहराचा पारा ४१ डिग्रीवर पोहोचला होता. ग्रामीण भागातही हीच स्थिती होती. त्यामुळे एक-दोन दिवसांत पाऊस कोसळण्याची शक्‍यता व्यक्त होत होती.

दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा झाली की यात्रेत उधळलेला गुलाल धुऊन जाण्यासाठी वरुण राजा धुवाँधार कोसळतो, अशी आख्यायिका आहे. शनिवारी (ता. ३१) चैत्र यात्रा झाली, अजूनही भाविक परतीच्या मार्गावर आहेत, तोपर्यंत आज वरुण राजाने जोरदार हजेरी लावली. शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या अटल चषक फुटबॉल स्पर्धेचा सामनाही थांबवावा लागला. भाजी मंडईसह इतर बाजारपेठेतही पावसाने पाणी पाणी केल्याने लोकांनी सुरक्षित ठिकाणी थांबणे पसंत केले. मध्यवर्ती बसस्थानकात त्यामुळे प्रचंड गर्दी झाली होती. शहराला लागून असलेल्या उपनगरांनाही या पावसाने झोडपून काढले. 

गडहिंग्लजला तासभर बरसात
गडहिंग्लज - शहरासह तालुक्‍यात आज वळीव चांगलाच बरसला. पावसाने तुरळक गारांसह सुमारे तासभर हजेरी लावली. 

रब्बी हंगामात उशिरा पेर झालेल्या ज्वारी आणि गहू पिकाच्या काढणीत अडचण निर्माण झाली आहे. दुपारी साडेतीनच्या सुमारास गारांसह पावसाला सुरवात झाली. जोरदार सरी कोसळू लागल्याने नागरीकांची धावपळ उडाली. दरम्यान, कौलगे, कडगाव, नेसरी, महागाव, जरळी या भागात जोरदार सरी कोसळल्या. काही ठिकाणी गाराही पडल्या. 

पन्हाळ्यात फक्‍त वारा नि विजाच
पन्हाळा- थंड हवेच्या पन्हाळगडावर सकाळपासून दिवसभर एवढं गरम होत होतं... एवढं गरम होत होतं की, घराघरातील गरगरणारे पंखेदेखील गरम हवा फेकत होते. दुपारनंतर गडाच्या दक्षिण बाजूला हळूहळू ढगांची गर्दी जमू लागली... वावटळ उठलं... गोल गोल पिंगा घालू लागलं... आणि आता पाऊस पडणार तोही जोरदार... असे वाटत असतानाच विजाही चमकू लागल्या... वाऱ्याने जोर धरला नि आलेला पाऊस वरच्या वर चालता झाला.... फक्‍त वाहत्या काळ्या ढगांची साक्ष ठेवून... पाऊस लवकर येणार म्हणून घाईगडबडीने घरी आलेल्यांची फजिती झाली नि पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वांचीच निराशा झाली.

गारगोटी परिसरात तुरळक
गारगोटी - कडगाव, पिंपळगाव परिसरात आज वादळी वार्यासह तुरळक पाऊस झाला. अनेक भागात अचानक वादळ सुरू झाल्याने धुळीचे लोट उडाले. यानंतर तुरळक पावसाने हजेरी लावली.

बालचमूसह महिला रस्त्यावर
शहरात टप्प्याटप्प्याने पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला शहराच्या पश्‍चिम व दक्षिण भागात पाऊस सुरू झाला. मंगळवार पेठ, शिवाजी पेठ, बुधवार पेठेत गारांसह धुवाँधार पाऊस झाला. गारा वेचण्यासाठी या परिसरात बालचमूसह महिला रस्त्यावर दिसल्या. अनेकांनी पहिल्या पावसात मनमुदार भिजण्याचा आनंद घेतला. कसबा बावडा परिसरात जरा उशिराच पण धुवाँधार पाऊस सुरू झाला. 

दृष्टिक्षेपात पाऊस
 शाहू स्टेडियमवरील सामना पावसाने रद्द
 भाजी मंडईत पाणीच पाणी
 सोशल मीडियावर पावसाची धून 
 वाऱ्यामुळे जाहिरातीचे फलक फाटले 
 दसरा चौकात झाड पेटले 
 गडहिंग्लजला झोडपले
 पन्हाळ्यात वारा आणि विजाच
 गारगोटी परिसरात तुरळक
 शाहू स्टेडियमवरील फुटबॉल सामना रद्द 
 अनेक सखल भागात पाणी साचले
 गटारींना नाल्याचे स्वरूप
 वाऱ्यामुळे जाहिरातीचे फलक फाटले
 गटारीचे पाणी रस्त्यावर
 पावसापासून बचावसाठी लोक मध्यवर्ती बसस्थानकात

सोशल मीडिया धून
एकीकडे सोसाट्याचा वारा सुरू होऊन विजांचा कडकडाट सुरू होतो, तोपर्यंत सोशल मीडियावर पहिल्या पावसाचे स्वागत करणाऱ्या संदेशांची धून सुरू झाली. पावसाचे स्वागत करणाऱ्या विविध पोस्ट पटापट फिरू लागल्या. ‘परत म्हणायचं नाही गरम होतंय, गारी पण फ्री दिल्यात - इति वरुण राजा’, ‘आता आणखी एक नवा ऋतू ‘उनसाळा’, ‘ह्याला म्हणतात जोतिबाचा महिमा, सालाबादप्रमाणे डोंगर धुवायला पाऊस पडला, जोतिबाच्या नावानं चांगभलं’ सोशल मीडियावर फिरणाऱ्या यासारख्या संदेशांनी धमाल उडवून दिली.

दसरा चौकात झाड पेटले
दसरा चौकात वीज वाहून नेणाऱ्या उंच झाडांचा स्पर्श झाल्याने एका झाडाला आग लागली. अग्निशमक दलाच्या बंबांनी ही आग विझवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com