शिरोळ तालुक्यात ढगफुटी सदृष्य पाऊस

युवराज पाटील
रविवार, 15 ऑक्टोबर 2017

दानोळी  - दानोळी, कुंभोज, कोथळीसह परिसरामध्ये आज (रविवारी) सायंकाळी पाचच्या सुमारास ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. जोरदार वाऱ्यामुळे  रस्त्यावर झाडे पडल्याने व अनेक ओढयावर रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली.

दानोळी- जयसिंगपूर, दानोळी - निमशीरगाव, कुंभोज- दानोळी, कोथळी-जयसिंगपूर या मार्गावर अनेक झाडे पडली होती, त्यामुळे मार्ग बंद झाले होते. प्रवासी व स्थानिकानी पडलेली झाडे तोडून तात्पुरता मार्ग खुला करण्याचा प्रयत्न केला.

सायंकाळी पाच च्या सुमारास जोरदार वाऱ्यासह प्रचंड पावसास सुरवात झाली. वाऱ्याचा प्रचंड वेग आणि जोरदार पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. झाडे पडल्याने दानोळी परिसरातील सर्व वाहतूक ठप्प झाली होती. जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी ऊस पीक आडवे झाले आहे. तसेच खरीप पिकात पाणी साचून राहिल्याने पिकाचे मोठे  नुकसान होण्याची शक्यता आहे.

Web Title: Kolhapur news Heavy Rains in Danoli