अनुदानित वसतिगृह संघटनेचा आंदोलनाचा इशारा

प्रकाश तिराळे
गुरुवार, 24 मे 2018

मुरगुड - राज्यातील अनुदानित आश्रमशाळा, अपंग शाळा, शासकीय वसतिगृह अधिक्षक व कर्मचारी यांना वेतनश्रेणी प्रमाणे पगार देण्यात यावा अन्यथा 29 मे पासून आझाद मैदान मुंबई येथे लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. या मागण्याचे निवेदन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना देण्यात आले. 

राज्यात सामाजिक न्याय विभागाच्यावतीने चालवण्यात येणाऱ्या आश्रम शाळा, अपंग शाळा व शासकीय वसतिगृहात काम करणाऱ्या कर्मचारी यांना वेतनश्रेणी प्रमाणे पगार दिला जातो. मात्र अधिक्षक व कर्मचारी यांना तटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. समान काम, समान दाम या न्यायाप्रमाणे या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, अशी मागणी गेली अनेक वर्षांपासून केली जात असुन सरकारने याची दखल घेतली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.  

राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत 2388 एवढी अनुदानित वसतिगृह आहेत. यामध्ये 8104 कर्मचारी 24 तास सेवा देऊन अल्पशा मानधनावर काम करत आहेत. त्यांना वेतनश्रेणी देण्यात यावी. 

निवेदनावर मारूती कांबळे, सुनिल राठोड, किरणकुमार संग्रामपूरकर, तुकाराम कांबळे, आशिष केंद्रे, अजित राजमाने, बाबूराव दुवे, महादेव चव्हाण, निलेश शिंदे, सुरेश राठोड आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Kolhapur News hostel organization agitation