हुपरी नगरपालिका निवडणूकीत अकरावाजेपर्यंत 36 टक्के मतदान

हुपरी नगरपालिका निवडणूकीत अकरावाजेपर्यंत 36 टक्के मतदान

हुपरी ( जि. कोल्हापूर ) : हुपरी नगरपालिकेची ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक  होत आहे. 11 ठिकाणी 27 मतदान केंद्रावर चुरशीने मतदान सुरू होत आहे. सकाळी साडेअकरा वाजे पर्यंत 35.68 टक्के मतदान झाले. 21770 मतदारांपैकी 7768 मतदारांनी बजावला.

नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित आहे. नगराध्यक्ष व एकूण 18 नगरसेवक पदासाठी ही निवडणूक होत आहे. मतदान शांततेत सुरू असून हुपरी पोलीसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

अत्यंत चुरशीची ठरलेली निवडणूक भाजपसह ताराराणी जिल्हा विकास आघाडी, अंबाबाई विकास आघाडी, शिवसेना यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. सर्वच पक्ष व आघाड्यांची ताकद पणाला लागली आहे.

दृष्टिक्षेपात

  •  चंदेरीनगरी हुपरी नगरपालिकेची पहिलीच निवडणूक 
  •  परिसरासह जिल्ह्यातील नेतेमंडळी व राजकीय क्षेत्राचे लक्ष 
  •  थेट नगराध्यक्ष तसेच १८ नगरसेवक पदांसाठी मतदान 
  •  नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी आरक्षित 
  •  एकूण १०० उमेदवार निवडणूक रिंगणात

गत एप्रिलमध्ये हुपरी नगरपालिकेची अंतिम उद्‌घोषणा झाली. त्यानंतर सुरू झालेल्या नगरपालिका निवडणूक प्रक्रियेचा अंतिम टप्पा गाठला आहे. बारा दिवस निवडणूक प्रचाराचा धुरळा उडाला. नगराध्यक्षपदासाठी जयश्री महावीर गाट ( भाजप), सीमा प्रकाश जाधव (ताराराणी जिल्हा विकास आघाडी), गीतांजली दौलतराव पाटील (मनसेप्रणीत अंबाबाई विकास आघाडी), विमल मुरलीधर जाधव (शिवसेना) व दीपाली बाळासाहेब शिंदे (अपक्ष-राष्ट्रवादी पुरस्कृत) या प्रमुख उमेदवारांत चुरशीची रंगतदार लढत होत आहे.

महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर, जिल्हाध्यक्ष हिंदूराव शेळके, माजी मंत्री प्रकाश आवाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, आमदार सुजित मिणचेकर, मनसेचे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com