कोल्हापूरः हुपरी नगर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर हद्दपारीची कारवाई

बाळासाहेब कांबळे
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

हुपरी (जि. कोल्हापूर): गणेश उत्सव, बकरी ईद व आगामी हुपरी नगर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर उपद्रवी तसेच गुंड प्रवृत्तीच्या १६ लोकांवर हद्दपारीची कारवाई केल्याची माहिती हुपरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी दिली .

गेल्या काही महिन्यात लाचखोरी सारख्या घडलेल्या गुन्ह्यांमुळे हुपरी पोलिस ठाण्याची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याचा आपला प्रयत्न असल्याचे सांगून श्री. शिंदे म्हणाले, ठाण्यांतर्गत २५० च्या वर सार्वजनिक गणेश मंडळांनी तर तीस ते चाळीस हजार खासगी गणपती प्रतिष्ठापित केले आहेत.

जिल्हा पोलिस प्रमुख संजय मोहिते अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. दिनेश बारी, उपअधिक्षक विनायक नरळे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यांतर्गत हुपरी, रेंदाळ, पट्टण कोडोली, यळगुड, इंगळी व तळंदगे गावात यंदाचा गणेश उत्सव डॉल्बी मुक्त वातावरणात होत आहे. गणेश उत्सव, बकरी ईद सणाच्या आनंदात कोणतेही विघ्न येवू नये यासाठी तसेच हुपरी नगर पालिकेची निवडणूक निर्भय वातावरणात पार पडावी यासाठी कायद्याची चोख अंमलबजावणी करणार आहे.

त्यासाठी ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील सचिन शिवा पणंदे, रणजित आनंदा बिरांजे (दोघे रा. पट्टण कोडोली), विक्रम मनोहर काटकर, बाळासो वसंत माळी, मयुर सुरेश बडवे, कुणाल किरण म्हेतर, प्रकाश अण्णासो काटकर, तानाजी शामराव काटकर, इम्रान दिलावर जमादार (सर्व रा. हुपरी), दस्तगिर अप्पालाल मुजावर, गुरुनाथ बाजीराव खोत, सुखदेव महादेव पोवार, प्रशांत सुरेश गुरव, निलेश प्रकाश काळगे, अमित चंद्रकांत गिरी व संतोष रमेश चव्हाण (सर्व रा. रेंदाळ) यांच्यावर हद्दपारीची कारवाई केली आहे.

कार्यभार हाती घेतल्या पासून गेल्या दोन महिन्यात बेकायदेशीर बीअर बार तसेच दारु बंदीचे २૪ गुन्हे दाखल करुन २ लाख ६८ हजार ५०९ तर जुगार अड्यावर १६ गुन्हे दाखल करुन ૪ लाख २८ हजार ७२૪ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ८ गुंडांवर प्रतिबंधक कारवाई केली आहे.

दरम्यान, आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या प्रयत्नाने आमदार फंडातून पोलिस ठाण्याच्या आवारात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात येत असून, ठाण्याचे अंतर्बाह्य सुशोभिकरण करणार असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले.