आंतरराष्ट्रीय चोरट्यांच्या टोळीचा कोल्हापूरला विळखा

राजेश मोरे
रविवार, 29 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - आंतराराष्ट्रीय चोरट्यांच्या टोळ्यांचा कोल्हापूर शहराला विळखा पडला आहे. या टोळ्यांकडून घरफोड्या, ऑनलाईन फसवणुकीसह चंदनचोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. त्या टोळ्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

कोल्हापूर - आंतराराष्ट्रीय चोरट्यांच्या टोळ्यांचा कोल्हापूर शहराला विळखा पडला आहे. या टोळ्यांकडून घरफोड्या, ऑनलाईन फसवणुकीसह चंदनचोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. त्या टोळ्यांना जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

कोल्हापूरची सधन जिल्हा अशी महाराष्ट्रात ओळख आहे. राज्यातील प्रगतिशील शहर म्हणून कोल्हापूरकडे पाहिले जाते. या शहराला आता आंतरराष्ट्रीय चोरट्यांच्या टोळीने लक्ष्य केले आहे. वर्षभरापूर्वी शाहूपुरीतील मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी सुमारे १७ लाखांच्या मोबाईलवर डल्ला मारला होता. सीसीटीव्हीद्वारे चोरट्यांचा छडा लावण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले. चोरट्यांची ही टोळी बिहारी होती, येथपर्यंतच तपास झाला. मात्र, त्यांना पकडण्यात यश आले नाही.

सोनतळी (ता. करवीर) येथील वन विभागाच्या नर्सरीत चोरट्यांनी दरोडा टाकला. तेथून लाखोंचे चंदन व तेल लुटले. चंदन तेल कोलकता, चीन येथपर्यंत नेल्याचे तपासात पुढे आले. चार महिन्यांपूर्वी रुक्‍मिणीनगर येथील हॉटेल व्यावसायिकाचा बंद फ्लॅट फोडून चोरट्याने सुमारे १५ लाखांचे दागिने व रोकड लंपास केली होती. त्या चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले नाही; पण राजस्थानात चोरट्यांची टोळी तेथील स्थानिक पोलिसांनी पकडली. तपासात रुक्‍मिणीनगर येथील घरफोडीची त्यांनी कबुली दिली. त्यांनी हरियाना, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात कोल्हापुरात घरफोड्या व चोऱ्या केल्याचेही उघड झाले आहे. त्या टोळीचा ताबा घेण्यासाठी शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पथक रवाना झाले आहे. खरेदीच्या नावाखाली सयाजी हॉटेलमधून १५ लाखांचे घड्याळे लंपास करणारे चोरटेही मध्य प्रदेशात असल्याचे पुढे आले आहे.

बक्षीस लागले आहे. एटीएम, क्रेडिट कार्ड बंद पडले अशी फोनवर बतावणी करून लाखोंचा गंडा घालण्याचे प्रकार तर रोज घडत आहेत. सायबर सेलच्या तपासात हरियाना, दिल्ली, रांची, पंजाब असे मोबाईल लोकेशन दाखविते. अल्पवयीन मुलांकडून नागरिकांचे मोबाईल चोरायचे. त्यानंतर ते कर्नाटकात विकणाऱ्या टोळीला पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. अशा विविध गुन्ह्यांत आंतरराष्ट्रीय टोळीचा विळखा शहराला बसू लागला आहे. 

पोलिसांसमोरील अडचणी
- परराज्यांतील पोलिसांकडून असहकार्य
- दलातील अपुरे मनुष्यबळ
- सीसीटीव्हीतील उणिवा, लाईट मोडचा अभाव
- जिल्ह्याला लागून परराज्यांची हद्द