किमती घड्याळे लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा

किमती घड्याळे लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा

कोल्हापूर  - खरेदीच्या बहाण्याने 15 लाखाची किमती घड्याळे लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश आले. टोळीच्या सूत्रधारास आज पोलिसांनी अटक केली. अनिल तुळशीराम जोशी (वय 38, सध्या रा. बडोदरा, गुजरात, मूळ रा. शांतीनगर, मालाड वेस्ट मुंबई) असे त्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून साडेतीन लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

हॉटेल सयाजीमध्ये 2 सप्टेंबरला दोन भामटे उतरले. त्यांनी साईक्‍स एक्‍सस्टेंशन येथील ऍटीटयुड वॉच स्टुडिओशी फोनवरून सपर्क साधला. त्यांनी किमंती घड्याळे खरेदी करणार आहे. दुकानात यायला वेळ नाही. हॉटेल सयाजी मध्ये थांबलो आहोत. तेथे येऊन घड्याळे दाखवा असे सांगितले. स्टुडिओतील व्यवस्थापक गौतम सुभाष कामकर यानी त्यानुसार 15 लाख 800 रुपये किमंतीची घड्याळे त्यांना दाखविण्यासाठी काढली. त्यांनी ती घड्याळे दाखविण्याची जबाबादरी विक्रम शर्मा यांच्यावर सोपवली. शर्मा यांची नजर चुकवून दोघा भामट्यांनी 15 लाखाची किमंती घड्याळे लंपास केली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याचा तपास शाहूपुरीसह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेद्वारे सुरू होता.

मुंबईत संशयित अनिल जोशी येथून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांने साथिदाराच्या मदतीने 15 लाखाची घड्याळे लंपास केल्याची कबुली दिली. त्याच्या साथिदारांचा शोध सुरू आहे. पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, सहायक पोलिस निरीक्षक संजीवकुमार झाडे, उपनिरीक्षक राजेंद्र सानप, युवराज आठरे, अमोल माळी, कर्मचारी सुजय दावणे, आसिफ कलायगार, श्रीकांत पाटील, संजय कुंभार, राजू आडूळकर, संजय हुंबे, किरण गावडे, प्रदीप नाकील, अमित सर्जे, राजेंद्र निगडे, अमर वासुदेव, महादेव गुरव, अमर आडसुळे यांनी ही कारवाई केली. 

असा झाला तपास -  
हॉटेल सयाजीमधून प्राप्त झालेल्या सीसी टीव्ही फुटेजवरून चोरट्यांचा शोध सुरू होता. 2012 मध्ये सहारा पोलिस ठाणे मुंबईत असाच प्रकारे गुन्ह्याची नोंद झाली होती. त्यानुसार सीसी टीव्ही फुटेजवरून पुढील तपास सुरू केला. त्यात अनिल जोशीने साथिदाराचे फोटो व सीसी टीव्हीत साम्य अढळले. अनिल हा मुळचा शांतीनगर, मालाड वेस्ट मुंबईचा असून गेल्या चार वर्षापासून बडोदरा गुजरात येथे राहत असल्याची माहिती पुढे आली. पण तो अधून मधून मुंबईत आईला भेटण्यासाठी येत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तेथे सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांने साथिदारासोबत कोल्हापुरात किमंती घड्याळांची चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. 

गंडा घालण्याची पद्धत -  
देशातील कोणत्याही शहरात जायचे. इंटरनेटवरून तेथील घड्याळे, कॅमेरे, लॅपटॉप, मोबाईल शोरूमची माहिती घ्यायची. त्यांचा संपर्क क्रमांकावर अनिल जोशी हा इंग्रजीत संवाद साधायचा. त्यात तो एका मोठा कंपनीत अधिकारी म्हणून कार्यरत असल्याचे सांगायचा. कंपनी किमंती वस्तू खरेदी करणार आहे. पण मालकांना वेळ नाही. तुम्ही ती वस्तू दाखवायला हॉटेलमध्ये या असे मालकाला सांगायचा. पण त्यापूर्वी शहरातील आलिशान हॉटेलमध्ये तेथे एकमेकाला ऍटेच असणाऱ्या दोन रुम बुकींग करायचा. तेथे वस्तू दाखवायला आलेल्याला मालक आतील रुममध्ये मिटींगमध्ये असल्याचे त्याला सांगायचा. आत जावून वस्तू दाखवून येतो असे भासवून दुसऱ्या रुमच्या दरवाज्यातून साथिदारासह पसार व्हायचा, अशी त्यांची चोरीची पद्धत असल्याचे तपासात पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

आणखी सहा गुन्हे उघडकीस - 
संशयित अनिल जोशीने साथिदाराच्या मदतीने कोल्हापूरसह, नागपूर येथून 10 किमंती घड्याळे, चेन्नईतून दोन लॅपटॉप, रायपूर येथून तीन कॅमेरे, डेहराडूनहून 10 किमंती मोबाईल आणि विशाखापट्टणम येथून सहा किमंती मोबाईल खरेदीच्याच बहाण्याने चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन घड्याळे, दोन लॅपटॉप, एक कॅमेरा असा 3 लाख 60 हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिसांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com