जाहीर पॅनेलच्या नेतृत्वावरून पुन्हा वादाची ठिणगी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

कोल्हापूर - देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार जनता सेंट्रल को-ऑपरेटिव्ह कंझ्युमर्स सोसायटीच्या (जनता बझार) निवडणुकीसाठी काल (ता. २७) पॅनल निश्‍चित केल्यानंतर सुरू झालेला वाद थांबण्यापूर्वीच पॅनलच्या नेतृत्वावरून नव्या वादाची ठिणगी पडली आहे. यासंदर्भात आज दोन वेगवेगळी निवेदने प्रसिद्ध करण्यात आली. 

पहिल्या निवेदनात पॅनलच्या नेतृत्व करणाऱ्यांच्या यादीत असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार सतेज पाटील यांची नावे प्रसिद्धीस दिलेल्या दुसऱ्या निवेदनातून वगळण्यात आली. 

या निवडणुकीसाठी दोन्ही गटांचे मिळून एक पॅनल करण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे बुधवारी (ता. २६) रात्री दोन्ही गटांच्या उमेदवारांचा समावेश असलेली उमेदवारांची यादी जाहीर झाली. पण, काल माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या उपस्थितीत राजाराम कारखान्यातील बैठकीत जाहीर झालेल्या यादीतून आमदार सतेज पाटील यांच्या समर्थकांची नावे वगळून त्यांना शह देण्यात आला. वगळलेल्या नावांत पॅनलप्रमुख प्रल्हाद चव्हाण यांचे पुत्र सचिन यांचाही समावेश होता. रात्री सचिन यांनी आपण स्वतंत्र पॅनल उभा करण्याचा इशारा दिला होता. 

पी. एन. पाटील यांची भेट घेऊन आज हा निर्णय जाहीर होईल, असे सांगितले होते; पण त्यांची व पी. एन. पाटील यांची भेटच झाली नाही. त्यामुळे हा निर्णय उद्या (ता. २९) पर्यंत प्रलंबित ठेवण्यात आला. पॅनल ठरवताना झालेला शह-काटशह सुरूच असताना या पॅनलचे नेतृत्व करणाऱ्यांच्या यादीत पी. एन. पाटील व सतेज पाटील यांचे नाव आल्याने पुन्हा गोंधळ उडाला आहे. जाहीर झालेल्या पॅनलच्या प्रमुखांनी यासंदर्भात दोन निवेदने प्रसिद्धीला दिली. पहिल्या निवेदनात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, महादेवराव महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, सतेज पाटील, अमल महाडिक, माजी मंत्री विनय कोरे यांची नावे आहेत. पण, त्यानंतर दुसऱ्या निवेदनात सतेज पाटील व पी. एन. पाटील यांची नावे वगळली. दुसऱ्या निवेदनावर प्रल्हाद चव्हाण, उदय पोवार, बाळासाहेब कुंभार यांच्या सह्या आहेत. पी. एन. पाटील व सतेज पाटील यांच्या नावालाच आक्षेप घेतल्याने त्यांची नावे वगळली.

मिनी बझार सुरू करणार
पॅनलतर्फे निवेदनात संस्थेच्या सुरू असलेल्या १७ स्वस्त धान्य दुकानातून मिनी बझार सुरू करण्याचे आश्‍वासन देण्यात आले आहे. महापालिकेच्या जागेतील इमारतीच्या भुईभाड्याची पाच वर्षे रक्कम न मिळाल्याने संस्था व्यवसाय करू शकलेली नाही. ३० वर्षांची मुदत मागितली असताना ती पाच वर्षे करण्यात आली. महापालिकेने १५ हजारांचे भाडे ५० पटींनी वाढविले असून, त्याविरोधात न्यायालयात दावा सुरू असल्याचे म्हटले आहे.