शिवाजी महाराजांचे श्रेष्ठत्व कमी करण्याचा भाजपचा डाव - जयंत पाटील

बोरगाव (ता. वाळवा) : येथे विलासराव पाटील स्मृितदिनानिमित्त स्नेहविलास या स्मरणिकेचे प्रकाशन करताना आमदार जयंत पाटील, सदशिव पाटील आदी.
बोरगाव (ता. वाळवा) : येथे विलासराव पाटील स्मृितदिनानिमित्त स्नेहविलास या स्मरणिकेचे प्रकाशन करताना आमदार जयंत पाटील, सदशिव पाटील आदी.

नवेखेड - शालेय पाठ्य पुस्तकातून मोंगलाचा इतिहास काढून टाकून शिवाजी महाराजांचे श्रेष्ठत्व कमी करण्याचे काम भाजप सरकार करीत आहे, असा सणसणीत आरोप आमदार जयंत पाटील यांनी केला.

बोरगाव (ता. वाळवा) येथे विलासराव पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. विट्याचे माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी आमदार भगवानराव साळुंखे,राज्य बॅंकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

जयंतराव पाटील म्हणाले, की पुस्तकातून मोंगलांचा इतिहास काढून टाकणे म्हणजे नव्या पिढीला खरा इतिहास समजता कामा नये, असे आहे. अप्रत्यक्ष महाराजांचे कर्तृत्व कमी करण्याचे षडयंत्र आखले जात आहे. लोकांनी वेळीच सावध व्हावे.या सरकारला हा इतिहास संपवून पेशवे ते बाळाजी विश्वनाथ इतकाच इतिहास ठेवायचा आहे, असा आरोप केला. बोरगावने शैक्षणिक क्षेत्रात  केलेल्या चांगल्या कामाबद्दल गौरवोद्‌गार काढले.बदलत्या अध्यापन पध्दतीचा स्वीकार सर्व शाळांनी करावा.

माजी आमदार सदाशिवराव पाटील. म्हणाले की, विलासराव पाटील हे सद्‌भावनेचे प्रतीक होते. कुटुंबवत्सल होते. जयंत पाटील यांनी या कुटूंबाकडे नेहमी सारखे लक्ष द्यावे.

यावेळी विलासराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.पाटील यांच्या जीवनावरील स्नेहविलास या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी आमदार भगवानराव साळुंखे, टी ए.यादव, वासंती कांबळे यांची भाषणे झाली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com