शाहू महाराजांचा दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

कागल - राजर्षी शाहू महाराजांचा जीवनपट उलघडून दाखविणारी निवडक कागदपत्रे व दुर्मिळ छायाचित्रे यांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन पुराभिलेख संचलनालय कोल्हापूर पुरालेखागार कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. येथील राममंदिरात 30 जून अखेर हे प्रदर्शन सुरु राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन खासदार धनंजय महाडिक व म्हाडा पुणेचे अध्यक्ष श्रीमंत समरजितसिंह घाटगे यांच्याहस्ते संपन्न झाले. 

या प्रदर्शनात कोल्हापूर पुरालेखागारात उपलब्ध असलेली छ. शिवरायाची दहा अस्सल पत्रांची छायाचित्रे आहेत. या ठिकाणी दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी शाहू महाराजांनी घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, कृषी, पर्यावरण विषयक महाराजांचे कार्य, क्रीडा क्षेत्रातच्या उत्तेजनार्थ केलेले कार्य, वैद्यकीय सुधारणाबाबत केलेले ठराव व जाहिरनामे, जनतेच्या आरोग्य रक्षणार्थ वैद्यकीय क्षेत्रात केलेली कामगिरी, कला व सांस्कृतिक क्षेत्रात केलेले कार्य, पत्रव्यवहार, रेल्वे व शामिल पायाभरणीची छायाचित्रे, महाराजांच्या दत्तक विधानासंदर्भातील महत्त्वपूर्ण कागदपत्रे, राज्यारोहनाची तसेच कौंटुंबिक छायाचित्रे, त्यांचे प्रशासकीय कार्य, राज्यारोहन प्रसंगी कल्याणकारी राज्याचा संकल्प करणारा पहिला जाहिरनामा, जनकल्याणार्थ केलेले महत्त्वपूर्ण कायदे, शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी, सामाजिक व दलित उध्दारासाठी केलेले कार्य आदींबाबतची निवडक कागदपत्रे व दुर्मिळ छायाचित्रे यांचा समावेश या प्रदर्शनात आहे. 

या शिवाय दररोज सायंकाळी पाच वाजता विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार ता. 27 रोजी विश्‍वमांगल्य सभा संस्थेचा "जिजाऊ मॉ साहेब संस्कार" कार्यक्रम, बुधवार ता. 28 रोजी डॉ. विलास पवार यांचे "छ. शाहू महाराज" या विषयावर व्याख्यान, गुरुवार ता. 29 रोजी कोल्हापूरच्या कलाकारांचा मर्दानी खेळ, शुक्रवार ता. 30 रोजी शाहीर रंगराव पाटील यांचा पोवाडा कार्यक्रम होणार आहे. सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक संचालक केशव जाधव यांच्याकडून करण्यात आले आहे.