कापशी - गडहिंग्लज मार्ग झाड पडल्याने बंद

कापशी - गडहिंग्लज मार्ग झाड पडल्याने बंद

सेनापती कापशी - येथील तमनाकवाडा रस्त्यावर आंबेओहळजवळ रस्त्यात मोठे झाड पडल्याने रात्रीपासून वाहतुक बंद झाली आहे.

मध्यरात्री हे झाड पडले.  सकाळी गडहिंग्लज, निपाणी व कापशीकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसची कोंडी झाली. बाभळीचे व मोठे झाड असल्याने ते सहज बाजूला करणे शक्य नव्हते. त्यामुळे अनेक वाहने येथे पर्यंत येऊन मागे परतत होती. सकाळी नोकरी निमित्त व कॉलेजला जाणाऱ्यांची अडचण झाली. काही वाहन चालकांनी 10 ते 12 किलोमीटरचा फेरा घेऊन बाळेघोल मार्गे जाणे पसंद केले. सार्वजनिक बांधकामचे उप अभियंता एस. व्ही. बारवेकर यांनी झाड त्वरित काढण्यासाठी कर्मचारी पाठवणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com