‘जोगनभाव’ स्वच्छ करण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

बेळगाव -  ‘सौंदत्ती येथील यल्लम्मा डोंगरावरील मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या जोगनभाव येथे शुद्ध पाणी उपलब्ध करून परिसरात स्वच्छता राखावी, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी,’ अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेतर्फे गुरुवारी (ता. १२) जिल्हाधिकारी झियाउल्ला एस. यांच्याकडे करण्यात आली.

सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या भक्तांची संख्या मोठी आहे. कर्नाटकासह महाराष्ट्र आणि गोव्यामधून दरवर्षी भक्त यात्रेनिमित्त येतात. डोंगराच्या पायथ्याशी जोगनभाव येथे आंघोळ करण्याची प्रथा आहे. यात्रेपूर्वी तेथील स्वच्छता करण्यात येत नाही. त्यामुळे दुर्गंधीयुक्त आणि हिरव्या रंगाचे पाणी असते. तोंडात न घेता अंगावर ओतून घेतले जाते. पायऱ्याही घाण झालेल्या असतात. जोगनभावमधील पाणी स्वच्छ व दुर्गंधीमुक्त असावे. कुंडाजवळ महिलांसाठी कपडे बदलण्यासाठी बंदिस्त खोली असावी. कपडे धुण्यासाठी शेजारी नळाची व्यवस्था असावी. त्यामुळे कुंडाचे पाणी अस्वच्छ होणार नाही.

स्वच्छतागृह, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी. बसेस आरक्षित जागेपर्यंत सोडण्याची परवानगी द्यावी. संबंधित पोलिसांना सूचना द्याव्यात. डोंगरावरील शॉवरची संख्या वाढवावी आणि नादुरुस्त शॉवर दुरुस्त करावेत. पुरेसा पाणीपुरवठा, रुग्णवाहिका उपलब्ध करावी, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. संघटनेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.