महापालिकेच्या तीनशेंवर जागा कुळांकडे 

डॅनियल काळे
मंगळवार, 15 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - महापालिकेने भुई भाड्याने दिलेल्या खुला जागांची गणतीच महापालिकेत नाही. महापालिकेच्या अशा 300 हून अधिक जागा कुळांच्याकडेच आहेत. या जागाही नाही, आणि भाडेही नाही, अशी अवस्था महापालिकेची झाली आहे. या खुल्या जागांना महापालिकेने रेडीरेकनरप्रमाणे भाडे आकारणी सुरू केली आहे. त्यावेळीपासून भाडेकरूंचे भाडेच महापालिकेत जमा नाही. महापालिकेच्या उत्पन्नाचा एक स्त्रोत म्हणून या विभागाकडे पाहिले, जात असले तरी अनेक बाबतीत आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातयं अशी अवस्था झाली आहे. काही निवडक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्यावरच या विभागाची भिस्त आहे.

कोल्हापूर - महापालिकेने भुई भाड्याने दिलेल्या खुला जागांची गणतीच महापालिकेत नाही. महापालिकेच्या अशा 300 हून अधिक जागा कुळांच्याकडेच आहेत. या जागाही नाही, आणि भाडेही नाही, अशी अवस्था महापालिकेची झाली आहे. या खुल्या जागांना महापालिकेने रेडीरेकनरप्रमाणे भाडे आकारणी सुरू केली आहे. त्यावेळीपासून भाडेकरूंचे भाडेच महापालिकेत जमा नाही. महापालिकेच्या उत्पन्नाचा एक स्त्रोत म्हणून या विभागाकडे पाहिले, जात असले तरी अनेक बाबतीत आंधळ दळतंय आणि कुत्रं पीठ खातयं अशी अवस्था झाली आहे. काही निवडक कर्मचारी, अधिकाऱ्यांच्यावरच या विभागाची भिस्त आहे. वरिष्ठ अधिकारी या विभागाकडे लक्ष द्यायला तयार नाहीत, जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत. इस्टेट विभागाची फाईल म्हणजे संशयास्पदच असणार या पूर्वगृहदूषितपणाने पाहिले जात असल्याने महापालिकेचा कारभार आतबट्ट्यातच येत आहे. 

महापालिकेला जबाबदारी अंगावर घेऊन काम करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाणवाच आहे. यायंच महापालिकेच्याच कर्मचाऱ्यांना कामाला लावायचे आणि टक्‍केवारीच्या माध्यमातून लूट करून बदली करून निघून जायचे, असेच काही महाभाग वरिष्ठ अधिकारी महापालिकेच्या वाट्याला येत असल्याने गेल्या चार पाच वर्षांत महापालिकेच्या अवस्था बुडत्याचा पाय खोलात, अशीच होत चालली आहे. हक्काचे उत्पन्न असलेली जकात बंद झाली, एलबीटीही बंद झाली. घरफाळ्यात वाढ नाही. पाणीपट्टीत वाढ नाही. त्यामुळे तुटपुंजे उत्पन्न आणि खर्चात होत असलेली बेसुमार वाढ यामुळे महापालिकेचा डोलारा कधी ढासळेल हे सांगता येत नाही. त्यातही हक्काचे उत्पन्न असलेल्य विभागांकडे महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी ढुंकूनही पहात नाहीत. त्यामुळे उत्पन्न मिळवून देणारे मार्ग आपोआपच बंद आहेत. 

इस्टेट विभागाकडे गाळेधारकांच्या भाडेवाढीचा विषय तर प्रलंबित आहेच. याशिवाय भुईभाड्याने घेतलेल्या खुल्या जागांचाही ताळमेळ नाही. महापालिकेच्या तीनशेहून अधिक जागा भुईभाड्याने रहिवास कारणासाठी अथवा व्यावसायिक कारणासाठी दिल्या आहेत. या जागेत राहणाऱ्यांना, व्यवसाय करणाऱ्यांना पूर्वी नाममात्र म्हणजे अगदी 20 ते 30 रुपयांपासून शंभर ते दोनशे रुपयांपर्यत भाडे आकारली आहेत. आता मात्र भाडेवाढीचे निकषच बदलले आहेत. रेडीरेकनर हाच एक आधार मानून भाडेवाढ केली जात आहे. यामुळे जागांचे भाडे आता दहापटीने वाढले आहे. ज्या जागेला 200 ते 300 रुपये भाडे आकारले होते. ते आता 2 ते 3 हजार रुपयांवर पोचले आहे. 

रेडीरेकनरप्रमाणे भाडे वाढल्याने भाडेकरून हवालदिल झाले आहे. आहे ते भाडे भरायला ते तयार आहेत. पण महापालिका भाडे भरून घेत नाही. रेडीरेकनरचीच आकारणी महापालिकेला अपेक्षित असल्याने हा देखील विषय प्रलंबित आहे. 

खरेदी मागणीचे अर्ज वाढणार 
खुल्या जागांना जादाचे भाडे आकारणी झाल्याने आता महापालिकेकडे जागा खरेदी मागण्याचे प्रमाण वाढणार आहे. भाड्याने जागा घेण्यापेक्षा खरेदी घेणेच हिताचे असल्याने असे प्रस्तावाबाबत चौकशी होत असल्याचे समजते. दरम्यान, 500 चौरस फुटापेक्षा जादा जागा खरेदी देता येणार नाही, तसेच अशी जागा त्या भाडेकरूने किमान दहा वर्षे वापरायला हवी, असे काही नियम आहेत. त्यामुळे आता खरेदी मागणीचे अर्जही वाढणार असल्याचे समोर येत आहे.
 

Web Title: kolhapur news kmc