कोल्हापूर: केएमटी बसखाली सापडून शिक्षिका ठार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जुलै 2017

राधिका तेरदाळ या सुर्वेनगर येथील महावीर इंग्लिश स्कूलमध्ये गेल्या चार वर्षापासून त्या भूगोल विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या मूळच्या बेंगरुळच्या आहेत. त्यांचे पती हे एका खासगी कंपनीत मार्केटींग ऑफीसर म्हणून काम करतात.

कोल्हापूर : मंगळवार पेठ वारे वसाहत येथे सकाळी केएमटीखाली सापडून मोपेडस्वार शिक्षिका जागीच ठार झाल्या. राधिका नरेंद्र तेरदाळ (वय 47, रा.मंडलिक पार्क, सायबर चौक परिसर) असे त्यांचे नाव आहे. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलिस ठाण्यात झाली. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती, राधिका तेरदाळ या सुर्वेनगर येथील महावीर इंग्लिश स्कूलमध्ये गेल्या चार वर्षापासून त्या भूगोल विषयाच्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. त्या मूळच्या बेंगरुळच्या आहेत. त्यांचे पती हे एका खासगी कंपनीत मार्केटींग ऑफीसर म्हणून काम करतात. त्यांची मुलगी ही इंजिनिअर असून ती गेल्या दोन महिन्यापासून बेंगरुळ येथे काम करते. सध्या त्या आणि त्यांचे पतीच घरी असतात. आज शनिवार असल्याने सकाळची शाळा होती. आकराच्या सुमारास शाळा सुटली. त्यानंतर त्या पाण्याचा खजीना परिसरातील पार्श्‍वनाथ बॅंकेत पैसे काढण्यासाठी मोपेडवरून गेल्या. त्याच दरम्यान राजोपाध्येनगरहून केएमटी बस मध्यवर्ती बसस्थानकच्या दिशेने जात होती. बसवर चालक म्हणून एम. एम. नाईक तर वाहक म्हणून जितेंद्र संकपाळ हे कर्तव्य बजावत होते. वारेवसाहत येथून बॅंकेच्या दिशेने तेरदाळ या बॅंकेच्या दिशेने मोपेडवरून जात असताना त्यांची केएमटी बसची धडक बसून त्या गाडीखाली सापडल्या. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. ही घटना परिसरातील नागरिकांनी पाहीली. त्यांनी आरडाओरड करत बस थांबवली. तसे बॅंकेतील कर्मचारीही बाहेर आले. त्यांनी तेरदाळ यांना ओळखले. त्यानंतर नागरिकांनी जखमी तेरदाळ यांना रुग्णवाहिकेतून उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांकडून त्यांना सांगण्यात आले. 

बॅंकेतील कर्मचाऱ्यांनी तेरदाळ यांच्या अपघाताची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका धनश्री व्हनागडे यांना दिली. त्या तातडीने शिक्षक कर्मचाऱ्यांसह सीपीआरमध्ये दाखल झाल्या. व्हनागडे यांनी याची माहिती तेरदाळ यांच्या पतीला दिली. ते तातडीने सीपीआरमध्ये दाखल झाले. घडलेल्या या घटनेमुळे त्यांना धक्काच बसला. ते मोबाईलवरून मुलीशी व नातेवाईकांशी संपर्क साधत होते. त्यांना शिक्षक राम यादव हे धीर देत होते. शाळा सुटेपर्यंत आपल्या सोबत असलेली आपली सहकारी मैत्रिणीचा अचानक अपघाती झालेल्या मृत्यूने शिक्षकांनाही अश्रू अनावर झाले. शिवविच्छेदनानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. महिन्याभरातील केएमटी अपघातातील ही दुसरी घटना होय. महिन्याभरापूर्वी गंगावेश येथे टपाल खात्यातील महिला कर्मचारी सापडून तिचा मृत्यू झाला होता.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
12 सिंहांच्या गराड्यात तिने दिला बाळाला जन्म
शेतकरी विधवा महिलांनी काढली मुख्यमंत्र्यांची अंत्ययात्रा
मारुतीच्या मोटारी 3 टक्क्यांनी स्वस्त
मेस्सी बालपणीच्या मैत्रिणीसोबत विवाहबंधनात
अनंतनाग: सुरक्षारक्षक व दहशतवाद्यांमध्ये चकमक

पुतनामावशीची कणव
'जीएसटी' देशभरात लागू; संसदेत ऐतिहासिक सोहळा​
'जीएसटी': सामान्य माणसास अल्पकाळ बोचणारा!​
धुळ्यातील शेतकऱ्यांनी कमी खर्चात तयार केले मोटरसायकलचे कोळपे​
धुळे जिल्ह्यात भावी शिक्षकांची 'डीएड'कडे पाठ
असाही एक शिक्षणाच्या भक्तीचा मार्ग (वारीच कोंदण)​
भारताचा विंडीजवर 93 धावांनी विजय; मालिकेत 2-0 ने आघाडी​
‘सीएम’चा ‘पिंपळ’ बकरीने खाल्ला​
'जीएसटी'ला तमाशाचे स्वरूप : राहुल गांधी​