एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीवर चाकू हल्ला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - एकतर्फी प्रेम प्रकरणातून टाकाळा येथे आज सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान महाविद्यालयीन युवतीवर चाकूने हल्ला करण्यात आला.

कोल्हापूर - एकतर्फी प्रेम प्रकरणातून टाकाळा येथे आज सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान महाविद्यालयीन युवतीवर चाकूने हल्ला करण्यात आला.

प्रेमाला नकार दिल्याचा राग मनात धरून अज्ञात युवकाने त्याच्या मित्राच्या सोबत तिच्यावर चाकूने हल्ला केला. यात युवती जखमी झाली असून तिला उपचारासाठी सीपीआर येथे दाखल करण्यात आले आहे. या संदर्भात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अज्ञात हल्लेखोरांचा तपास करत आहेत. भरदिवसा झालेल्या या हल्ल्याने आणि दिवसा ढवळ्या मुलींची छेडछाडच्या प्रकरणात वाढ झाली आहे. या घटनेने शहरातील निर्भया पथकावर नागरीकांच्यातून प्रश्न निर्माण केला जात आहे.

टॅग्स