कोल्हापूर - बीदर एक्सप्रेस उद्यापासून

संतोष भिसे
मंगळवार, 12 जून 2018

मिरज - कोल्हापूर ते बीदर ही नवी साप्ताहीक एक्‍सप्रेस बुधवारी ( ता. 13 ) सुरु होत आहे. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलींद देऊस्कर हे कोल्हापूर स्थानकात रात्री एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. मिरजेतही प्रवासी संघटना तिचे स्वागत करणार आहेत. 

मिरज - कोल्हापूर ते बीदर ही नवी साप्ताहीक एक्‍सप्रेस बुधवारी ( ता. 13 ) सुरु होत आहे. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मिलींद देऊस्कर हे कोल्हापूर स्थानकात रात्री एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. मिरजेतही प्रवासी संघटना तिचे स्वागत करणार आहेत. 

वीस डब्यांची ही गाडी (11415) प्रत्येक बुधवारी रात्री 11.35 वाजता कोल्हापुरातून सुटेल. दुसऱ्या दिवशी (गुरुवारी) सकाळी 10.15 वाजता बीदरमध्ये पोहोचेल. दिड तासांच्या विश्रांतीनंतर दुपारी पावणेबारा वाजता परत कोल्हापूरसाठी (क्रमांक 11416) सुटेल, रात्री 12.35 वाजता कोल्हापुरात पोहोचेल. 

या गाडीला भालकी, उदगीर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, कुर्डुवाडी, पंढरपूर आणि मिरज हे थांबे आहेत. नऊ स्लिपर, तीन वातानुकुलीत, सहा जनरल डब्यांचा समावेश आहे. कोल्हापूर-नागपूर ही एक्‍सप्रेस कोल्हापुरात चार दिवस थांबून असते, या काळात ती कोल्हापूर - बीदर एक्‍सप्रेस म्हणून धावेल. 

पाठपुराव्याला यश 

प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील आणि प्रवासी सेनेचे कार्याध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, या गाडीसाठी बरेच दिवस पाठपुरावा सुरु होता. या गाडीने पश्‍चिम महाराष्ट्र कर्नाटकशी जोडला जाणार आहे. प्रवाशांची चांगली सोय होईल. 

दरम्यान, बुधवारी उद्घाटन केल्यानंतर श्री देऊस्कर गुरुवारी सकाळी कोल्हापूर स्थानकाची तपासणी करतील, त्यानंतर दुपारपर्यंत मिरज स्थानकाची तपासणी होईल. दुपारनंतर स्वतंत्र कोचने पुण्याला रवाना होतील.

Web Title: Kolhapur News Kolhapur - Bidar Express from Tomorrow