कोंडिग्रे माळरानावर ९ लाखांचा गुटखा जप्त

कोंडिग्रे माळरानावर ९ लाखांचा गुटखा जप्त

इचलकरंजी - कोंडिग्रे (ता. शिरोळ) येथील पाच मैल परिसरातील एका गोदामावर गुरूवारी दुपारी छापा टाकून पोलिसांनी नऊ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. त्यात सुगंधी सुपारी, एम. तंबाखू, वेगवेगळ्या कंपनीच्या गुटख्यांचे पाऊच यांचा समावेश आहे. या गोदामाचे कनेक्‍शन इचलकरंजी, सांगलीबरोबर असण्याच्या दिशेने पोलिसांचा तपास सुरू झाला आहे.

कारवाईमध्ये प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक डॉ. सई भोरे-पाटील, उपाधीक्षक रमेश सरवदे, इचलकरंजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम, कॉन्स्टेबल विजय तळसकर, महेश कोरे, वैभव दड्डीकर, राजू पट्टणकुडे, सागर पाटील आदींचा सहभाग होता.

काही महिन्यांपूर्वी कोंडिग्रे परिसरात सुरू असलेल्या अवैध गुटख्याच्या कारखान्यावर छापा टाकून गुटखा निर्मितीच्या यंत्रसामग्रीसह लाखो रुपयांचा गुटखा, तंबाखू जप्त करण्यात आला होता. संबंधित कारखानाही उद्‌ध्वस्त केला होता. असे असताना इचलकरंजी-सांगली रस्त्यावर कोंडिग्रे गावालगतच्या पाच मैल भागामधील शेतवडीमध्ये बांधलेल्या गोदामामध्ये गुटख्याचा साठा असल्याची माहिती येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक शहाजी निकम यांना मिळाली. त्यांनी ही माहिती प्रशिक्षणार्थी पोलिस उपाधीक्षक डॉ. सई भोरे-पाटील, उपाधीक्षक रमेश सरवदे यांना दिली. त्यांच्या सूचनेनुसार गोदामावर छापा टाकला. तेथील सुमारे ९० पोत्यांमध्ये सुगंधी सुपारी, विविध कंपनीच्या गुटख्यांचे पाऊच, एम. तंबाखू असा सुमारे नऊ लाखांचा गुटखा आणि तंबाखू असा मुद्देमाल जप्त केला. ही माहिती कोल्हापूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यावरून या विभागाचे अधिकारी सायंकाळी सहाच्या सुमारास तेथे गेले. रात्री उशिरापर्यंत या गोदामात पंचनामा आणि जप्तीची कारवाई सुरू होती. याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलिसांत गुन्हा नोंद झाला नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com