कोल्हापूर पालिकेत फवारणीस अवघे तीसजण

कोल्हापूर पालिकेत फवारणीस अवघे तीसजण

कोल्हापूर -  पाऊस, तुंबलेले नाले आणि घाणीचे साम्राज्य यामुळे शहरात रोगराई पसरणार नाही, याची काळजीही महापालिकेने आता घ्यायला हवी; पण महापालिकेकडे असणारी यंत्रणाच तोकडी आहे. कीटनाशक फवारणीसाठी महापालिका प्रशासनाकडे संपूर्ण शहरासाठी अवघे ३० कर्मचारी आहेत.

एका प्रभागाची पाळी आठवड्यातून एकदा यावी, अशी अपेक्षा आहे; पण महिनोन्‌महिने फवारणी होत नसल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. गरजेपेक्षा निम्मेच कर्मचारी असल्याने ही यंत्रणा कोलमडत आहे.

शहरात यंदाच्या पावसाळ्यात डेंगी, हिवताप आणि स्वाईन फ्लूचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. याचा फैलाव झाला, अशी म्हणण्याची स्थिती आहे. दाटवस्ती आणि झोपडपट्टी विभागात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. शहरातील दलदलीची आणि घाणीचे साम्राज्य असणारी ठिकाणी आजार निर्माण करणारी केंद्रेंच आहेत. यंदा पावसाळ्यात अनेक ठिकाणी गटारे, नाले तुंबलेली आहेत. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढलेले आहे. डासांचा उपद्रव साऱ्यांनाच होत आहे. त्यामुळे आता शहरातील साफसफाईवर लक्ष केंद्रित करायला हवे.

अपुरी यंत्रणा 
शहरात कीटनाशक फवारणी करण्यासाठी ३० कर्मचारी आहेत. दर आठवड्यातून एका विभागात फवारणी व्हावी, अशी अपेक्षा आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे महिनोनमहिने एखाद्या विभागात फवारणीच होत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे कर्मचारी संख्या वाढायला हवी, अशी मागणी होत आहे.

फॉगिंग मशीन
धूर फवारणी करण्यासाठी शहरात सात मशीन आहेत. या सात मशीनसाठी दहा कर्मचारी नेमले आहेत. मशीनच्या माध्यमातूनही धूर फवारणी करून डासांचा उपद्रव नियंत्रित करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे.

पेट्रोल भत्ता नाही
पूर्वी सायकलला फॉगिंग मशीन लावून शहरात धूर फवारणी केली जात होती; पण सायकलच्या गतीपेक्षा मोटारसायकल बरी आणि कमी वेळेत शहरातील जास्तीत जास्त ठिकाणी धूर फवारणी करणे शक्‍य होईल म्हणून मोटारसायकलला फॉगिंग मशीन लावण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानुसार धूर फवारणी सुरू झाली. कर्मचाऱ्यांच्या मोटारसायकललाच फॉगिंग मशीन लावले आहे; पण या कामासाठी हे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या खिशालाच चाट बसत आहे. या कर्मचाऱ्यांना पेट्रोल भत्ता नसल्याने त्यांचा तोटा होत आहे. प्रशासनाने पेट्रोल अलौन्स मिळायला हवा, अशी मागणी आता होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com