कोल्हापूरात ऑक्‍टोबर हिटसह भारनियमनाचेही चटके

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - कोळसा टंचाईमुळे शहरी भागात सव्वा ते तीन तासांचे आणि ग्रामीण भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन सुरू झाले आहे.

कोल्हापूर - कोळसा टंचाईमुळे शहरी भागात सव्वा ते तीन तासांचे आणि ग्रामीण भागात पाच ते सहा तासांचे भारनियमन सुरू झाले आहे.

दिवाळीच्या खरेदीची धामधूम सुरू असताना भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. राज्यभरात विजेच्या एकूण मागणीच्या दोन हजार मेगावॉट इतका तुटवडा आहे. ऑक्‍टोबर हिटच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना आता त्यात भारनियमनाची भर पडली आहे. जिल्ह्यात सुमारे ३०० मेगावॉट विजेचा तुटवडा आहे.

पहिल्या तीन गटांतील शहरे ही शंभर टक्के भारनियमनमुक्त आहेत. कोळसा टंचाईचा वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. यंदा पाऊस चांगला झाल्याने कृषिपंपाच्या विजेची मागणी वाढली आहे. सकाळी आठ तास आणि रात्री आठ तास असा वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे सुरू आहे. नागरी भागात बऱ्याच वर्षांनी भारनियमन झाले. चार-पाच वर्षांपासून अपवाद वगळता भारनियमन झाले. राज्यभर भारनियमन असल्याने कोल्हापूर जिल्ह्याची त्यातून सुटका झालेली नाही. शहरी भागात सकाळी सव्वा तास आणि सायंकाळी सव्वा तास असे अडीच तासांचे भारनियमन सुरू आहे. 

Web Title: kolhapur news load shading and October heat