कर्जमाफीसाठी कर्ज घेण्याची वेळ 

राजकुमार चौगुले
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - कर्जमाफीचे अर्ज दाखल करण्यास अवघ्या तीन दिवसांचा कालावधी उरला आहे. दीड लाखापेक्षा जर जास्त कर्ज असेल तर उर्वरित रक्कम भरल्याशिवाय दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार नसल्याचा शासनाचा नियम आहे.यामुळे या रक्कमेपर्यंतची कर्जमाफी मिळविण्यासाठी उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना बॅंकेत भरावी लागणार आहे. पण ज्या शेतकऱ्यांचे जादा कर्ज आहे त्यांना ही रक्कम भरावी लागणार असल्याने शेतकरी ही रक्कम उभी करण्यासाठी पै पाहुण्यांबरोबरच सावकारांकडेही उंबरठे झिजवत असल्याचे चित्र आहे.यामुळे कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पुन्हा सावकारी कर्ज घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. 

सरकारने गेल्या महिन्यात कर्जमाफीचा निर्णय घेतला. पण ती सरसकट न करता अनेक अटी लावून व तांत्रिक निकष कडक करुन शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. यामुळे प्रत्येक निकष पार करणे ही शेतकऱ्यांची डोकेदुखी बनत असल्याचे चित्र आहे. महा इ सेवा केंद्राने आकारलेल्या शुल्कापासून ते सर्व्हर डाउनमुळे शेतकऱ्यांत संतप्त प्रतिक्रीया व्यक्त होत आहेत. 

धीम्या यंत्रणेमुळे या प्रक्रियेला वेळ लागत आहे. मुदत संपण्याची वेळ जशी जवळ येत आहे,तसा यंत्रणेवर ताण वाढत आहे. काही सोसायट्यांनाही शासनाने थंबची यंत्रणा दिली आहे. तिथेही दिवसभर गर्दी होत आहे.ज्यांचे कर्ज दीड लाखापर्यंत आहे.त्यांच्या कर्जाची माफी होणार असली ज्यांचे कर्ज जास्त आहे त्यांना वरची रकक्कम भरल्याशिवाय माफी मिळणार नसल्याचे शासनाने सांगितले आहे. ही रक्कम जमविण्यासाठी आता शेतकरी ही रक्कम हात उसणे मागण्यासाठी वणवण करीत असल्याचे चित्र आहे. 

अडचणीतला खरीप आणि वाढती चिंता 
सध्या अडचणीतल्या खरीपामुळे यंदाच्या हंगामावरही पाणी फेरावे लागणार आहे. यामुळे उर्वरित रक्कमेची जुळणी कशी करायची, याच चिंतेच शेतकरी आहेत. पश्‍चिम महाराष्ट्रातही निकषास पात्र असलेल्या शेतकरऱ्यावरही उर्वरित रक्कम भरण्याचा दबाव दिसून येत आहे. ऐनवेळी पैसे उपलब्ध होत नसल्याने निकषात बसूनही भरण्यासाठी रक्कम नसल्याने शेतकरी दीड लाखापर्यंतच्या कर्जमाफी पासून वंचित राहाण्याची शक्‍यता आहे. 

सोसाटया अव्याहतपणे सुरु 
कर्जमाफीच्या अर्जासाठी शेतकरी गर्दी करत असल्याने गावागावातील सोसायट्या अव्याहतपणे सुरु आहेत.अनेक सोसाट्यांनी सुट्टीही न घेता कामकाज सुरु ठेवले आहे. निकष तपासणे व संबंधित बाबी पूर्ण करण्यात सोसाट्यांचे सचिव व कर्मचारी व्यस्त असल्याचे चित्र अनेक गावात सध्या आहे. 

वाढीची मागणी 
दिलेल्या मुदतीत तांत्रिक अडचणीअभावी गती येत नसल्याने या मुदतीनंतरही अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंजित राहाण्याची शक्‍यता आहे. अद्यापही अनेक प्रक्रियेबाबत संभ्रमावस्था असून शासनाने मुदत वाढवून द्यावी,अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Web Title: kolhapur news loan farmer