काँग्रेस- राष्ट्रवादी सत्तेशिवाय जगू शकत नाही: महादेव जानकर

सुनील पाटील
रविवार, 10 सप्टेंबर 2017

आमचा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे. जो राबतो त्यालाच आम्ही तिकीट देतो. आतापर्यंत पैशाच्या जीवावर घरदार सत्तेत राहिले. त्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना आता सत्तेशिवाय जगता येईना झाले आहे. त्यामुळे कोणतीही निवडणूक आली की माझ्या भावाला, जावायाला, पुतण्याला तुझ्या पक्षाचे तिकीट दे.

कोल्हापूर : काँग्रेस-राष्ट्रवादीतील लोक सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. कोटी रूपये खर्च करायला तयार आहे, पण आमच्या घरातल्याला तिकीट दे म्हणून मागे लागलेत, असा टोला पशुसंवर्धन मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकार यांनी लगावला. 

कोल्हापुरमध्ये क्रशर चौक येथे आयोजित राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते.

जानकर म्हणाले, आमचा पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आहे. जो राबतो त्यालाच आम्ही तिकीट देतो. आतापर्यंत पैशाच्या जीवावर घरदार सत्तेत राहिले. त्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना आता सत्तेशिवाय जगता येईना झाले आहे. त्यामुळे कोणतीही निवडणूक आली की माझ्या भावाला, जावायाला, पुतण्याला तुझ्या पक्षाचे तिकीट दे. प्रचारसाठी कोट्यवधी पैसे खर्च तयार आहे. असे सांगून तिकीट मागतात. पण मी पैशाकडे नाही तर प्रमाणिकपणे राबणाऱ्या कार्यकर्त्याकड़े पाहतो. आमच्या कार्यकर्त्यांकडे रूपाया नाही. पण गोरगरिबांना न्याय देण्याची धडपड़ आहे. याच धडपडीतून हा पक्ष आणखी मोठा होणार आहे, असे ही ते म्हणाले.